आपल्या आहारात फळांचा समावेश केल्याने शरीराला खूप फायदा होतो. बऱ्याच काळापासून सांगण्यात आले आहे. रोजच्या आहारात एका तरी फळाचा समावेश आपण केला पाहिजे. तसेच शरीराला ताजी फळे खाल्याने खूप फायदे होतात. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आहारातील फायबरसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे शरीर मजबूत राहण्यास मदत होते. फळांचे सेवन रोजच्या रोज केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. फळे खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आणि आपल्या पेशींना दुरुस्तीची संधी मिळते. पण काही लोक असे असतात ज्यांना फळच खायला आवडत नाही पण फळाचा रोजचा आहारात समावेश केल्याने काय फायदे होतात चला तर समजून घेऊयात.
फळांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. त्याचामध्ये फायबर आणि पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहातील साखर शोषून घेण्यास मदत होते. फळे खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील फळांचे सेवन केले जाते. फळांमध्ये नैसर्गिकरित्या पोषक घटक असतात. त्यातील एक उदाहरण घ्याच झालं तर जामुन, हे फळ मानसिक आरोग्य सुधारणारे फळ म्हणून ओळखले जाते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फळे खूप उपयोगी ठरतात. फळांमध्ये कमी कॅलरीज असतात. त्याच्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. फॅटचे प्रमाणही कमी आढळते, तर फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते.
फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) योग्य प्रमाणात आढळतात. त्यामुळे पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणारे नुकसान टळते. अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि न्यूरोडीजनरेटिव्ह या आजाराचा धोका कमी होतो. फळांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्सने(Enzymes) प्रमाण जास्त असते. त्याचमुळे पचनक्रिया चांगली होते. अननस या फळांमधील ब्रोमेलेन आणि पपईतील पपेन पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. रोजचा आहारात फळांचा समावेश करण खूप महत्वाचे आहे. त्याचमुळे शरीराला खूप फायदे होतात.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
Nayanthara ने जुळ्या मुलांसोबत साजरा केला पहिला ओणम, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
Parbhani मध्ये पावसाची तुफान बॅटिंग, तर अजित पवार कारने पोहचले बीडला…
तब्बल १७ वर्षानंतर बिग बी आणि किंग खान झळकणार एकत्र
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.