प्रत्येकाला नेहमी सुंदर दिसण्याची हौस असते. सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु, वाढत्या वयानंतर हळू-हळू चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. निरोगी आणि चमकदार त्वचा असावी, असे प्रत्येकालाच वाटते. पण बदलत्या आणि धका-धकीच्या जीवन शैलीमुळे शक्य होत नाही. बाजारात असे अनेक प्रसाधने, सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत,ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. चेहऱ्याची बाहेरून काळजी घेण्यासाठी सौंदर्य प्रसाधने महत्त्वाची भूमिका बजावतात. असे असले तरीही, त्वचेची आतून काळजी कशी घ्यायची? काय केल्याने आपण आतून सुंदर होऊ शकतो? सुरकुत्या पडण्याची कारणे कोणती आहे? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
कॉलेजन हे एक प्रोटीन आहे ज्यामुळे आपली त्वचा लवचिक होण्यास मदत मिळते. यामुळे आपली त्वचा चमकते. नैसर्गिकरीत्या त्वचेतील कॉलेजनची पातळी कशी वाढवता येते, ते पाहूया.
१. हायड्रेटेड राहणे गरजेचे
चमकदार आणि मऊ त्वचा मिळविण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणत पाणी पिल्याने तुमचे शरीर नेहमी हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन केलेच पाहिजे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने कोलेजन वाढण्यास मदत होते.
२. अँटिऑक्सिडंट्स घ्या
अँटिऑक्सिडंट्स त्वचा डिटॉक्स करण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स पेशींमध्ये ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह वाढवतात. त्वचेचे अतिनील हानीपासून संरक्षण करण्यासाठी आणि कॉलेजन प्रथिनांची निर्मिती वाढवण्यासाठी देखील अँटिऑक्सिडंट्स ओळखले जातात.
३. व्हिटॅमिन सी
त्वचेतील कॉलेजन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन सीच्या सेवनाने तुमच्या त्वचेची श्वास घेण्याची क्षमता वाढते. यामुळे चेहऱ्यावरील डागही हळू-हळू नाहीसे होतात. त्यामुळे तुमच्या आहारात प्रामुख्याने व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या आणि फळांचा समावेश करा.
४. हंगामातील फळे खा
आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी फळांचा महत्त्वाचा सहभाग असतो. फळांमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला रॅडिकल्समुळे होणाऱ्या सेल्युलर नुकसानापासून संरक्षित करतात. ऋतूनुसार फळांचे सेवन केल्याने अतिरिक्त पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे हवामान आणि त्याच्या परिणामांपासून वाचण्यास मदत होते.
५. भरपूर भाज्या खा
भाज्यांमध्ये सुद्धा अँटिऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. भाज्यांमध्ये असलेले पोषणतत्व त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात.
तर या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा तजेलदार आणि आरोग्यमय ठेऊ शकता.
हे ही वाचा :
मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!
Maharashtra: ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, संजय राऊतांची आक्रमक भूमिका