हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक बदल होतात आणि वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर होतो. केसांमध्ये होणारा गुंता वाढून केस राठ होतात. यांसारख्या अनेक समस्या हिवाळ्यात जाणवतात, ज्यामुळे केस प्रचंड खराब होतात. एवढंच नाही तर, वाढत्या प्रदुषणाचा देखील केस आणि त्वचेवर परिणाम होतो, केसात कोंडा देखील होतो. म्हणून हिवाळ्यामध्ये केसांची आणि त्वचेची काळजी घेणं कठीण होतं. केसांमुळे सौंदर्यात भर पडते. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला हीट स्टाइलिंग साधनांचा वापर करतात. ज्याचा वाईट परिणाम केसांवर होतो. ड्रायर, फ्लॅट आयर्न आणि कर्लिंग आयर्न यांसारखी हीट स्टाइलिंग टूल्स आपल्या केसांना खूप नुकसान पोहोचवतात. केसांची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
१. शॅम्पू आणि कंडीशनर :
सल्फेट आणि पॅराबेन फ्री शॅम्पू वापरा. तसेच शॅम्पू वापरताना काळजी घ्या. केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा. कंडिशनरमुळे तुमचे केस हायड्रेटेड राहतील. केस धुतल्यानंतर फक्त पाच मिनिटे कंडिशनर लावा. कंडिशनर केसांना मॉइश्चरायझ करण्याचं काम करते. ज्यामुळे केसांची काळजी घेण्यास मदत होते.
२. जास्त गरम पाणी टाळा :
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील आणि केसांमधील ओलावा दूर होतो. ज्यामुळे केस आणि त्वचा दोन्ही कोरडे होतात. म्हणून जास्त गरम पाण्यात अंघोळ करु नका. कोमट पाण्यात अंघोळ केल्याने केस आणि त्वचेची काळजी घेतली जाते.
३. केसांना जास्त तेल लावू नका :
केसांना तेल लावण्याची सवय चांगली आहे. पण केस धुवण्यापूर्वी फक्त १ किंवा २ तास आधी तेल लावल्यामुळे केस चांगले राहतात. रात्री तेल लावणे आणि सकाळी धुवणे ही सवय चांगली नाही. असं केल्यास केस कमजोर होतात आणि तुटतात.
४. रोज केस धुवू नका :
हिवाळ्यात जास्त प्रमाणात केस धुवणं टाळा. रोज केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते. ज्यामुळे तुमचे केस कोरडे, राठ आणि कुरळे होतात. एवढंच नाही तर केसांमधील गुंता देखील वाढतो. म्हणून हिवाळ्यात आठवड्यातून फक्त दोनवेळा केस धुवावेत.
अशा प्रकारे काळजी घेऊन हिवाळयात तुमची त्वचा आणि तुमचे केस यांचे संरक्षण करा.
हे ही वाचा:
IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान
प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट