Monday, December 4, 2023

Latest Posts

दिवाळीत एकादा मॉडर्न लूक हवा आहे,तर साडी नेसल्यावर ट्राय करा फ्रिल वर्क ब्लाऊज

दिवाळीत एकादा मॉडर्न लूक हवा आहे,तर साडी नेसल्यावर ट्राय करा फ्रिल वर्क ब्लाऊज

दिवाळी म्हटलं तर आपण  मनसोक्त खरेदी करतोच.पण दरवेळी तीच फॅशन कॅरी करायला कंटाळा येतोच,आणि मुलींना फॅशनच्या बाबतीत नेहमीच अव्वल राहायचे असते, त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आउटफिट कलेक्शन असतात. आजकाल सगळ्यांनाच ट्रेंड फॉलो करायला आवडतो. फॅशन आणि स्टाइल वाढवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहेत. मुली नेहमीच त्यांच्या वॉर्डरोबमध्ये सर्व प्रकारचे स्टायलिश कलेक्शन ठेवतात. आता आपण फक्त वेस्टन ड्रेसवरच काहीतरी मॉडर्न लूक तयार करु शकतो असं नाही आहे,तर पारंपारिका साडीला ही मॉडर्नचा तडका देऊ शकतो.

आजकालच्या महिलांना फॅशन ट्रेंड चांगलाच समजतो आणि त्या व्यवस्थित कॅरी देखील करतात. त्यांना न्यु ट्रेंडची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमात कोणती स्टाइल करायची हे फॅशन ट्रेंड काय आहे हे पाहून ठरवले जाते. दिवाळीत साडी कॉमन असली तरी फ्रिल वर्कचा ट्रेंड आला आहे. आधी फ्रिलची साडी बाजारात आली आणि मग त्यावर फ्रीलचे ब्लाऊज घालण्याची स्टाइल आली. काठपदर असो वा पार्टीवेअर साडी अशा कोणत्याही साडीवर मॅच होईल असेच याचे डिझाईन आहे.काठपदर साडीला देखील मॅच होईल असं फ्रिल वर्कचे ब्लाउज घालु शकतो.सध्या बाजारात ब्लाउज साठी खुप छान छान कलेक्शन आले आहेत.

आज काही वेगळे ब्लाउज डिझाईन्स पाहुयात.

या डिझाईन्सने तूमचे ब्लाऊज आणि तूम्ही दोघेही खुलून दिसाल.जर तुम्हाला काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही ही डिझाइन करू शकता. अशा ब्लाउजला तुम्ही इंडो-वेस्टर्न लुकमध्ये स्टाइल करू शकता.जर तुम्हाला स्लीव्हज आणि नेक लाईनची रेग्युलर स्टाइल नको असेल तर त्याजागी तूम्ही फ्रिल्स वापरू शकता. तसेच, ब्लाउजच्या खाली नेटची लेस वापरता येईल. सध्या साडीमध्ये नेटची साडी तरूणींच्या पसंतीस उतरते आहे.

त्यावर अशाप्रकारचे नेटचेच फ्रिल वर्कचे ब्लाउज तूम्हाला क्लासी लुक देईल. तूम्हाला शोल्डरला फ्रील वर्क नको असेल तर तूमच्यासाठी हे डिझाईन परफेक्ट आहे. लेअर असलेले फ्रील डार्क कलर ब्लाउजला अजून स्टायलीश बनवेल ,त्यामुळे साडीला मॉडर्न लूक देण्याकरिता फ्रिल वर्कचे ब्लाउज नक्की ट्राय करा.

हे ही वाचा : 

पवारांच मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पुढच्या काळातच – दीपक केसरकर

‘टायगर ३’ चा नवीन प्रोमो प्रदर्शित,इमरान हाश्मीचा खलानयकाच्या भमिकेतील लूक आला समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss