जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खा. तुम्हचे शरीर निरोगी सुदृढ राहिल.सकाळी उटल्यानतंर रिकामी पोटी सगळ्यात आधी काय खाल्ल जावं या गोष्टींचा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडत असतो.
जर तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल आणि तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खा. सुका मेवा शरीराला खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. मनुके वापरल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण शरीराला पोषणही मिळते.आज आपण मनुक्यांच्या फायद्यांबद्दल जाणुन घेणार आहोत. चला जाणून घेऊया मनुकाचे फायदे.
मनुक्यांमध्ये असलेल्या घटकामुळे आपल्या शरिरात तयार होणार्या ऍसिडवर नियंत्रण ठेवता येते. तसेच यामुळे अॅसिडिटीपासूनही सूटका मिळते. मनुक्यांमध्ये भरपूर प्रोटिन असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे मनुक्याला इम्युनिटी बूस्टर असेही म्हणतात.
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी दररोज न विसरता मनुक्याचे पाणी प्यावे. मनुक्याचे पाणी पिल्यानं तुमचे बीपीही नियंत्रित राहते. ज्या लोकांच्या शरिरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुके आणि त्याचे पाणी घ्यावे. कारण त्यात भरपूर लोह असते. त्यामुळे चेहऱ्याची चमकही वाढू शकते. जे लोक रोज मनुक्याचं पाणी पितात त्यांची त्वचा खूप चमकते. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केस आणि त्वचा चांगली होते. निरोगी त्वचा आणि केसांसाठी, दररोज रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्या.तुम्हाला याचा रिजल्ट नक्की जाणवेल.
मनुक्याचे पाणी बनवण्याची आणि पिण्याची पद्धत
पाणी – २०० मिली
मनुके – ८० ते ९० ग्रॅम
एक भांडं घ्या, त्यात पाणी उकळवा आणि नंतर त्या गरम पाण्यात मनुके रात्रभर भिजवा.
सकाळी मनुके काढून बाजूला ठेवा आणि त्याचे पाणी हलके गरम करा. नंतर काही वेळाने ते प्या.
रोज रिकाम्या पोटी मनुका पाणी प्या
जेवण करण्यापूर्वी ३० मिनिटे आधी मनुक्याचे पाणी प्या
हे पाणी शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम करते.
मनुक्याचे पाणी पिण्याचे तोटे
मनुक्याचे पाणी जास्त प्यायल्याने डायरिया आणि गॅसची समस्या होऊ शकते.
मधुमेहाच्या रुग्णाने मनुके जास्त खाऊ नये. कारण त्यामुळे टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.
हे ही वाचा :
‘RSS’च्या १०० वर्षांच्या इतिहासावर बेतलेली वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
तुमचे गाल देखील थंडीत लाल होतात?, तर फॉलो करा या सोप्या टिप्स
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .