आपली त्वचा नाजूक आणि ठवठवित ठेवण्यासाठी आपण नवनविन उपाय नेहमीच शोधत वापरत असतो,कारण त्वचा ही आपली खुप नाजूक गोष्ट असते.त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या घरगुती गोष्टींचा वापर करतो. गुलाबजल आणि गुलाबाच्या फुलाचा वापर ही आपण आवर्जून करतो. गुलाबाचे फूल हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी गुलाबाचा आणि गुलाब पाण्याचा वापर आवर्जून केला जातो. गुलाब, झेंडू आणि जास्वंद ही फूले आपल्या त्वचेसाठी उपयुक्त आहेत. या फुलांमध्ये आता कमळाचा देखील समावेश झाला आहे.. कमळाच्या फुलाचा वापर करून आपण त्वचेच्या समस्या दूर करू शकतो. तसेच, त्वचेतील मृत त्वचा, पिंपल्स आणि काळे डाग इत्यादी समस्या कमळाच्या फुलाचा वापर करून दूर केल्या जाऊ शकतात. या फुलासोबत इतर घटकांचा वापर करून फेसपॅक्स बनवले जाऊ शकतात. जे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.चला तर मग घरच्या घरी कमळाच्या फुलाचा वापर करून बनवले फेसपॅक्स.
कमळाचे फूल आणि हळद
हळद आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कमळाचे फूल आणि हळदीचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत करते.हा फेसपॅक तयार करण्यासाठी कमळाच्या फूलांचा चुरा करा किंवा कमळाचे फूल स्मॅश करा. आता यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून याची पेस्ट तयार करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात गुलाबजल देखील मिक्स करू शकता. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
कमळाचे फूल आणि मसूर डाळ
मसूर डाळीचा वापर आपण अनेक प्रकारच्या फेसपॅक्समध्ये आवर्जून करतो. मसूरडाळीमुळे आपल्या त्वचेवर एक प्रकारचा उजळपणा येतो. कमळाचे फूल आणि मसूर डाळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी कमळाच्या फूलांचा चुरा करून घ्या किंवा कमळाचे फूल स्मॅश करून याची एक पेस्ट तयार करा.
आता या पेस्टमध्ये १-२ चमचे दूध मिसळा. आता यामध्ये २ चमचे बारीक केलेली मसूर डाळ मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. जर ही पेस्ट जास्त घट्ट झाली असेल तर, त्यात तुम्ही अधिक दूध मिसळू शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर २०-२५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका.अशाप्रकारे जर तुम्ही या उपायांचा उपयोग केलात तर तुम्हच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच मुलायमपणा आणि तजेलदार पणा दिसून येईल.
हे ही वाचा:
भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या कर्णधार कमिन्सची संघर्षमय कहाणी
चंद्रशेखर बावनकुळेंकडे जुगारासाठी करोडो रुपये कुठून आले, चौकशी करा?, नाना पटोले