Thursday, November 30, 2023

Latest Posts

चहा-कॉफीमध्ये साखर नको असेल,तर ‘या’ गोष्टींचा करा वापर

साखरेच्या सेवनाने मधुमेह, हृदयाशी संबंधित विकार आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. या सर्व कारणांमुळे लोक आहारातून साखरेचे प्रमाण कमी करत आहेत.साखर ही शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.

आपल्या नेहमीच्या वापरात साखरेचा वापर सहज नेहमीच होत असतो,जस की आपल्या भारतात मिठाई आणि साखरेचा वापर करून करण्यात आलेले खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. घरातही गोडाधोडाचे पदार्थ हमखास केले जातात. मात्र, या साखरेचे अनेक तोटे आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, डायबिटीस संभवतो आणि मग इतर समस्या ही सुरू होतात. परंतु, आजकाल बरेच जण आपल्या नेहमीच्या आहारातून साखरेचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. साखरेमध्ये कोणत्याही पोषकघटकांचा समावेश नसतो. उलट साखरेच्या सेवनाने मधुमेह, हृदयाशी संबंधित विकार आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. या सर्व कारणांमुळे लोक आहारातून साखरेचे प्रमाण कमी करत आहेत.साखर ही शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.

पंरतू काही लोकांना चहा आणि कॉफी नेहमी सकाळी-सकाळी पिण्याची इच्छा होत असते,खरं तर अशा परिस्थितीमध्ये मग चहा-कॉफी बनवताना साखरेचा वापर तर करायचा नाही, मग त्याऐवजी काय वापरायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. साखरेच्या ऐवजी कोणत्या गोष्टींचा वापर करता येईल जेणेकरून चव ही टिकून राहील,चहाही पिता येईल आणि शरीराला कोणत्या प्रकारची हानी पोहचणार नाही, चला तर मग जाणून घेऊयात साखर न वापरता चहा-कॉफी मध्ये काय वापरायचे..

गुळाचा वापर लाभदायी

गुळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. गुळाची चव ही नैसर्गिकरित्या गोड असते. त्यामुळे, याचा वापर चहा-कॉफीमध्ये केल्यावर चव ही साखरेसारखी लागते.

शिवाय, गुळामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. गुळामध्ये लोह, खनिजे इत्यादी पोषकघटकांचे प्रमाण आढळून येते. ज्यामुळे, शरीराला ऊर्जा मिळते. यासोबतच, गुळामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या सर्व कारणांमुळे, गूळ हा चहा आणि कॉफीमधील साखरेला एक चांगला आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.

कोकोनट शुगर

कोकोनट शुगर अर्थात नारळापासून काढण्यात आलेली नैसर्गिक साखर होयं. या नैसर्गिक साखरेमध्ये ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रक्टोज इत्यादी पोषक घटक आढळतात. ही कोकोनट शुगर चहा आणि कॉफीमध्ये मिसळल्यास याची चव साखरेसारखीच गोड लागते. शिवाय, यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात.

विशेष म्हणजे या नारळाच्या साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. ज्यामुळे, मधुमेहाच्या रूग्णांसाठी ही कोकोनट साखर अतिशय उत्तम आणि योग्य आहे. त्यामुळे, तुम्ही साखरेऐवजी कॉफी आणि चहामध्ये या कोकोनट शुगरचा वापर नक्कीच करू शकता आणि हा एक चांगला पर्याय आहे.

हे ही वाचा : 

उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

केवायसी ऑनलाईन अपडेट करत असाल तर सावधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss