सध्या आता सगळीकडे सणासुदीचं वेद लागले आहे. नुकतीच नवरात्र संपली आहे. आता वेद लागले आहेत ते दिवाळी या सणाचे,शॉपिंगचे,आणि सुंदर दिसण्याचे. त्यामुळे आता सगळेच दिवाळीची वाट पाहतायत. अशा वेळी मुलींसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सुंदर दिसणं. पण, जर चेहऱ्यावर पिंपल्स, डार्क स्पॉट्स, सुरकुत्या यांसारख्या समस्या असतील तर चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागतेच मात्र, सणाचा उत्साहसुद्धा कमी होतो. अशा वेळी त्वचेची योग्य निगा राखणे खूप गरजेची आहे. क्लीनअप हा एक उपाय आहे जो त्वचेला खोलवर स्वच्छ करतो आणि चेहऱ्याची चमक वाढवतो. पार्लरमध्ये क्लीनअप हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण तुम्हाला हे माहीत आहे,मात्र पार्लरमध्ये जायचं असेल तर खुप पैसे खर्च करावे लागतात,त्यामुळे काहींना ते परवडत नाहीत.त्यामुळे पार्लरला न जाता तुम्ही अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणू शकता.
चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यायची या टिप्स
चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा
फेस क्लिनिंगच्या प्रक्रियेतील पहिली स्टेप म्हणजे चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे. यासाठी हलक्या फेस वॉशचा वापर करा. फेसवॉश तळहातावर घ्या आणि त्याने हळूहळू चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
स्टीमिंग
चेहरा क्लिन करण्याची पुढची स्टेप म्हणजे स्टीमिंग. स्टीमिंग केल्याने ब्लॅकहेड्स आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकायला सोपे होते. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. पाण्याला चांगली उकळी आली की एक मोठा टॉवेल घ्या. आणि गरम पाण्याची वाफ घ्या. चेहरा पाण्यापासून काही अंतरावर ठेवा. साधारण ५ ते १० मिनिटं वाफ घ्या. वाफ घेतल्यावर काही वेळ चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा. यामुळे सैल त्वचा घट्ट होते.
स्क्रबिंग
स्टिमिंग केल्यानंतर चेहरा स्क्रब करावा लागतो. त्वचेच्या मृत पेशी स्क्रबिंगने सहज काढल्या जातात. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी चांगला स्क्रब तयार करू शकता. यासाठी अर्धा टोमॅटो घ्या. त्यात साखर आणि कॉफी पावडर एकत्र करा आणि टोमॅटोच्या स्लाईसच्या मदतीने हळूवारपणे चेहरा स्क्रब करा. काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
फेस पॅक लावा
शेवटी तुमच्या चेहऱ्याला फेस पॅक लावूून तुमची ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी एक चमचा बेसनामध्ये चिमूटभर हळद मिसळून त्याची पेस्ट दही किंवा गुलाबपाणीच्या मदतीने तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. फेसपॅक काढल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
स्क्रबिंग
स्टिमिंग केल्यानंतर चेहरा स्क्रब करावा लागतो. त्वचेच्या मृत पेशी स्क्रबिंगने सहज काढल्या जातात. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी चांगला स्क्रब तयार करू शकता. यासाठी अर्धा टोमॅटो घ्या. त्यात साखर आणि कॉफी पावडर एकत्र करा आणि टोमॅटोच्या स्लाईसच्या मदतीने हळूवारपणे चेहरा स्क्रब करा. काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चेहरा थंड पाण्याने स्वछ धुवा.
बघा या टिप्सचा तुम्ही जर योग्य पध्दतीने उपयोग केला तर घरच्या घरी तुम्हाला पार्लरमध्ये चेहरा ग्लो केला जातो अगदी तसाच रिजल्ट दिसुन येईल.
हे ही वाचा :
Inter Caste Marriage: काय आहे Dr. Ambedkar Scheme for Social Integration? याचा लाभ कोण घेऊ शकतात?
अखेर बच्चू कडू रामलल्ला चरणी, अयोध्यावरुन आता थेट संसद भवनापर्यंत जाणार