बदलत्या ऋतूचा आपल्या दैनंदिन जीवनात ही खुप फरक पडतो, आपल्या झोपणं, उठणं आणि खाणं या गोष्टी बदलतात. त्याचप्रमाणे त्वचेत देखील वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात.त्यामुळे त्वचेमध्ये बदल आवश्यक असतात. विशेषतः हिवाळ्यात त्वचेची फार काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूत त्वचेत कोरडेपणाची समस्या खूप वाढते. अशा वेळी त्वचेला आतून आणि बाहेरून हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हा सर्वोत्तम पर्याय असला, तरी हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण ही थोडे कमी होते. अशा वेळी, जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार ठेवायची असेल आणि कोरडेपणा आणि सुरकुत्यांपासून सुटका हवी असेल, तर तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये फेस मिस्टचा समावेश करणं गरजेच आहे,दरम्यान हा फेस मिस्ट तुम्ही पार्लरमध्ये न जाता तुम्ही अगदी घरच्या घरी देखील हा फेस मिस्ट तयार करू शकता. कसा ते जाणून घ्या.
ग्रीन टी फेस मिस्ट
ग्रीन टी नियमीत प्यायल्याने त्वचेवर असणारा तेलकट पणा कमी होतो,तसेच पिंपल्स ही कमी होतात. हे बंद झालेले पोर्स उघडण्यास मदत करते. ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होऊ लागते.
‘असा‘ बनवा फेस मिस्ट
1/2 कप पाणी घ्या आणि त्यात ग्रीन टी बॅग घाला. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर त्यात 2-3 चमचे गुलाब पाणी टाकून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. तुम्ही हा फेस मिस्ट फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एका आठवड्यासाठी वापरू शकता. सकाळी चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर स्प्रे करा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी किंवा चेहऱ्यावर मेकअप लावण्यापूर्वी देखील वापरू शकता.
काकडीपासून बनवलेला फेस मिस्ट
काकडी खाणे आणि लावणे दोन्ही आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. काकडीत पाण्याचे प्रमाण चांगले असते जे त्वचेला हायड्रेट ठेवते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर काकडीचा फेस मिस्ट खूप प्रभावी आहे.
होममेड फेस मिस्ट ‘असे‘ बनवा
सर्वात आधी, एक काकडी घ्या आणि ती चांगली बारीक करा. गाळणीच्या मदतीने काकडीचा रस वेगळे करा. आता काकडीच्या रसात रोजमेरी तेलाचे 6 ते 8 थेंब आणि एक चमचा गुलाब पाणी घाला. तुमचा होममेड फेस मिस्ट तयार आहे. हा फेस मिस्ट तुम्ही दररोज सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर स्प्रे करा.
फेस मिस्टचे फायदे
अत्यावश्यक तेल होममेड फेस मिस्टमध्ये वापरली जातात. ज्याचा सुगंध अरोमाथेरपीप्रमाणे काम करतो आणि त्वचेच्या मज्जातंतूंना आराम देतो. जेणेकरून त्वचा फ्रेश दिसते.बहुतेक होममेड फेस मिस्ट कूलिंग प्रॉपर्टी आणि नैसर्गिक सुगंध असलेले असतात. या दोन्ही गोष्टी त्वचेला फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. चेहऱ्यावरील फेस मिस्ट मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे रक्षण करतात.
तर घरच्या घरी फेस मिस्ट बनवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा.