Friday, June 2, 2023

Latest Posts

ऑनलाईन लिपस्टिक निवडताना ‘या’ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या… जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

सध्याच्या दुनियेत आपण अनेक गोष्टींमध्ये इंटरनेट (Internet ) चा वापर करतो. इंटरनेट च्या वापरामुळे आपले जीवन अगदी सोप्पे झाले असून आपला बरच वेळ सुद्धा वाचतो. काही वर्षांपासून वाढत्या इ कॉमर्स (E- commerce) च्या साईटमुळे आपण वस्तू ऑनलाइनच मागवतो.

सध्याच्या दुनियेत आपण अनेक गोष्टींमध्ये इंटरनेट (Internet ) चा वापर करतो. इंटरनेट च्या वापरामुळे आपले जीवन अगदी सोप्पे झाले असून आपला बरच वेळ सुद्धा वाचतो. काही वर्षांपासून वाढत्या इ कॉमर्स (E- commerce) च्या साईटमुळे आपण वस्तू ऑनलाइनच मागवतो. औषधांपासून ते किराणामालापर्यंत आपण अनेक गोष्टी ह्या ऑनलाईन मागवतो. ऑनलाईन शॉपिंग ला आपल्यापैकी बरेच लोक प्राधान्य देतात. कोरोनाच्या काळात सर्वानाच या ऑनलाईन खरेदी ची मोलाची साथ मिळाली. आपण कपडे आणि मेकअप चे सामान जास्त प्रमाणावर ऑनलाईन घेतो. त्याचे कारण म्हणजे ऑनलाईन शॉपिंग वर आपल्याला भरपूर डिस्काउं (Discount) मिळते आणि ब्रँडेड (Branded) वस्तू आपल्याला अगदी कमी दारात मिळून जातात. मेकअप ची बरीच साधने ही महिला ऑनलाईन पद्धतीने विकत घेण्यास प्राधान्य देतात. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण मेकअप चा वापर करतो, मेकअप मध्ये अनेक गोष्टींचं समावेश असतो पण त्या मध्ये लिपस्टिक (Lipstick) हि महत्वाची मानली जाते. लिपस्टिक लावल्यामुळे आपल्या चेहरा अजूनच आकर्षक दिसू लागतो. बहुतांश लोक लिपस्टिक ऑनलाईन घेतात. पण वस्तू ऑनलाईन खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. ऑनलाईन खरेदी करणे हे सोप्पे जरी असले तरी त्या मध्ये आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे लिपस्टिक घेताना आपण काही गोष्टींकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे.

ऑनलाईन लिपस्टिक खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

साईज आणि वजनाकडे लक्ष देणे – (Pay attention to size and weight)

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना आपण त्या वस्तूला स्पर्श करू शकता नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या वास्तूचे वजन आणि साईज (Size ) लक्षात येत नाही. ऑनलाईन खरेदी हि आपण अंदाज लावून करतो. ऑनलाईन वस्तू बघताना तिथे या वाटूची माहित नमूद केलेली असते. परंतु काही वेळा आपली याबाबत फसवणूक केली होऊ शकते. म्हणूच ऑनलाईन लिपस्टिक घेताना त्याच्या वजनावर आणि साईज वर आवर्जून लक्ष द्यावे.

एक्सपायरी डेट तपासून घ्यावी – (Check the expiry date)

ऑनलाइनच नव्हे तर कुठूनही वस्तू घेताना त्याची एक्सपायरी डेट (expiry date) तपासून घ्यावी. प्रत्येक डिटेल्स (Details) हे बारकाईने तपासून घ्यावे. त्या वस्तूची किंवा ती लिपस्टिक जरी असली तरी त्याची एक्सपायरी डेट आवर्जून तपासली पाहिजे. तुम्ही ते एक्सपायर झालेले प्रोडक्टस वापरले तर तुमचे खूप नुकसान होऊ शकते.

योग्य वेबसाईट ची निवड करा: (Select the appropriate website:)

सध्या प्रत्येकजणाला इंटरनेट च वापर करता येतो. या इंटरनेटवर लाखो कार्टोच्या संख्येने वेबसाईट्स उपलब्ध आहेत. या वेबसाईट्स मध्ये फेक (Fake ) वेबसाइट्स चा पण समावेश असतो. काही वेळा आपण वेबसाईट तपासून न पाहताच त्या वेबसाईट वरून आपण वस्तू मागवतो . आणि अश्या फेक वेबसाईट वरून आपल्याला फसवले जाऊ शकते. त्यामुळे वेबसाईट नेहमी तपासून घ्याव्या

ब्रँड – (Brand)

आपण ज्या ब्रँड ची लिपस्टिक मागवली आहे तो ब्रँड लक्षात ठेवून डिलिव्हरीमध्ये सुद्धा तोच ब्रँड मिळाला आहे का याची तपासणी केली पाहिजे. काहीवेळ आपण ज्या बंदची वाटू मागवली नसते तोच ब्रँड आपल्याला डिलिव्हरीमध्ये मिळतो.

हे ही वाचा : 

खुपते तिथे गुप्ते मधून मुख्यमंत्र्यांनी कोणाला केला ‘तो’ स्पेशिअल कॉल?

मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेचा केला जातोय खेळखंडोबा – संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss