रोजच्या स्वयंपाकासाठी तुपाचा वापर केला जातो. तूप हे तब्येतीसाठी खूप चांगले असते. पारंपरिक पद्धतीने लोण्याचे रवाळ साजूक तूप खायला सर्वांना आवडते. वरन – भात आणि साजूक तूप हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. तुपाचे तुमच्या शरिरासाठी असंख्य आयोग्यदायी फायदे आहेत.
अगदी तजेल त्वचेपासून ते गुडग्याची झिज भरून काढेपर्यंत सगळीकडे तुपाचा फायदा होतो. त्यामुळे अनेकजण तेलाऐवजी तुपाचा वापर करतात. मार्केट मध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे तूप आणि तेलाचे डब्बे उपलब्ध असतात. बाहेरून तूप आणताना ते अनेकदा भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. आता भेसळयुक्त तूप न खाता अस्सल चवीचे तुम्ही घरच्या घरी तूप बनवू शकता.
१) घरच्या घरी तूप बनवण्यासाठी आधी दूध गरम करायला ठेवा. दूध व्यवस्थित गरम झाल्यावर रूम टेम्परेचरवर आल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. रात्रभर फ्रिज मध्ये ठेवल्यानंतर दुधावर घट्ट साय तयार होईल. सकाळी साय काढून एका भांड्यात ठेवा. १-२ आठवडे साय साठवून एका डब्यात ठेवा.
२)साय साठवून झाल्यावर, ज्यावेळी तुम्हाला तूप बनवायचे असते तेव्हा साठवलेली साय एक भांड्यात काढा. आणि चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्या. एक कढईमधे मंद आचेवर हे फेटलेले मिश्रण घाला आणि सतत हलवत राहा. मलईचा रंग ब्राऊन होई पर्यंत शिजू द्या. नंतर गॅस बंद करून ते तूप गाळून घ्या.
३)घरी तूप बनवणे अनेकांना खूप कटकटीचे काम वाटते. अनेकांना तुपाचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते घरी तूप बनवणं टाळतात. अश्यावेळी तुम्ही तुपाचा वास येऊ नये. म्हणून कढईत लोणी किंवा तूप घातल्यावर त्यात लिंबाचे साल घालून गॅसवर ठेवा. जेव्हा याचा रंग पिवळसर होईल तेव्हा ते थंड होण्यासाठी ३० मिनिटे ठेवायचे.
४)त्यानंतर ते कोरड्या डब्यात गाळणीने काढून घ्यायचे आणि ते तूप दीर्घकाळ साठवून ठेवता येते.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
Fruit Food Custard बनवा अगदी सोप्या पद्धतीने!
आता घरीच बनवा विदर्भ स्पेशल मेथीचे आळण