Tuesday, April 16, 2024

Latest Posts

नैसर्गिकरित्या बनवा घरगुती Hair Pack

प्रत्येक स्त्रीला तिचे केसं अतिशय प्रिय असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अधिकच फुलते. प्रत्येकाला केसांचे महत्व माहित असते. म्हणूच प्रत्येकजण आपल्या केसांची काळजी वेगवेगळे उपाय करून घेत असतात. काहीजणांना आपले केस हे लांबलचक हवे असतात तर काहींना काळेभोर केस हवे असतात.

प्रत्येक स्त्रीला तिचे केसं अतिशय प्रिय असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अधिकच फुलते. प्रत्येकाला केसांचे महत्व माहित असते. म्हणूच प्रत्येकजण आपल्या केसांची काळजी वेगवेगळे उपाय करून घेत असतात. काहीजणांना आपले केस हे लांबलचक हवे असतात तर काहींना काळेभोर केस हवे असतात. आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेत असतात आणि त्यावर बरेच उपाय करत असतात. काहींना केस गळतीच्या, केसांमध्ये कोंडा होण्याच्या, केसात उवा होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने केसांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या केसांची निगा राखतात. वाढत्या प्रदूषणामुळे व सूर्याच्या किरणांमुळे आपले केस डॅमेज होऊ शकतात. उन्हामध्ये तर आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी काही लोक हजारो रुपये खर्च करतात. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महाग असलेले प्रोडक्टस वापरतात. अनेक महाग हेअर पॅक्स विकत घेतात. पण काही लोकांचे महाग प्रोडक्टस वापरूनही केस डॅमेज होतात. काही वेळेस तर केस पांढरेही होतात. अश्या प्रॉडक्ट्सचे तुम्हाला साईड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे असे प्रोडक्टस वापरून तुमच्या केसांचे भरपूर नुकसान होऊ शकते. पण तुम्हाला माहित आहे का असे महागडे प्रोडक्टस घेण्यापेक्षा तुम्ही घरीच हेअर पॅक्स बनवू शकता. घरी तुम्ही अगदी नैसर्गिक रित्या हेअर पॅक्स बनवू शकता. नैसार्गिगरीत्या बनवलेला नॅचरल हेअर पॅक् तुमच्या केसांची काळजी घेतो. त्यांचे सरंक्षण करतो. घरगुती हेअर पॅक मुळे तुमच्या केसांना योग्य ते पोषण मिळते. त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत नाही. नैसर्गिक रित्या बनवलेला हा हेअर पॅक तुमच्या केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.

आवळ्यापासून तयार केलेला हेअर पॅक –

आवळा हा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. तुमच्या केसांसाठी आवळा हा अतीशय गुणकारी असून तुम्ही आवळ्याचा हेअर पॅक लावला तर तो तुमच्या केसांचे सगळ्या समस्या पासून रक्षण करतो. आवळ्याचा हेअर पॅक बनवण्याची पद्धत हि खूप सोप्पी आहे. हा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही वाळवलेले आवडले हे पाण्यात उकळवून त्याची बारीकशी पेस्ट बनवून घ्या. त्याच पेस्ट मध्ये तुम्ही मेथीची पावडर किंवा वाफवलेल्या मेथीच्या बिया टाका. त्याचबरोबर त्यात २ चमचे दही टाका. नंतर ते एकत्रित करून तो पॅक साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवा. आवळ्याचा पॅक लावल्याने तुमची केस गळती कायमची थांबून जाईल. आठवड्यातून तुम्ही ३ दिवस हा हेअर पॅक तुमच्या केसांना लावू शकता. आणि तुम्हाला याचा फरक जाणवेल.

अंड्यापासून तयार केलेला फेस पॅक –

अंड हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या केसांची वाढ होण्यासाठी अंड अतिशय फायदेशीर आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए व बायोटिन असते ते आपल्या केसांसाठी योग्य ठरते. अंड्याचा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दोन अंडी फेटून त्यात मध घाला. हे मिश्रण केसांना लावून शॉवर कॅप ने कव्हर करा. आणि त्यानंतर साधारण २० मिनिटांनी केस स्वच्छ डन घ्या. असे केल्याने तुमच्या केसांची वाढ लवकर होईल.

बटाट्यापासून तयार केलेला फेस पॅक –

तुम्ही बटाट्यापासून सुद्धा फेस पॅक बनवू शकता. त्यासाठी तुम्ही एक बटाटा घेऊन त्याला किसून घेऊन त्यातले पाणी वेगळे करा. या पाण्यात कोरफड आणि साधारण २ चमचे मध चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आणि हा पॅक तुमच्या केसांना लावून चांगल्या प्रकारे केसांच्या मुळाशी मॉलिश करून घ्या. जवळजवळ दोन तास हा पॅक तुम्ही केसांना लावून ठेवा. दोन तास झाल्यानंतर अगदी कोमट पाण्याने तुम्ही केस धुवून घ्या. हा पॅक लावल्याने तुमच्या केसांना योग्य ते पोषण मिळेल. तुम्ही हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

स्वास्थ्यासाठी फायदेशीर तुळशीच्या बिया ‘हे’ आहेत फायदे :

Cannes Film Festival 2023 आहे ‘या’ तारखेला, तिकिटांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss