Friday, April 19, 2024

Latest Posts

अंड्यापासून बनवा नैसर्गिक Face Pack 

अंड हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असून त्याचा आपल्या त्वचेसाठी देखील भरपूर फायदा होतो. अंड खाण्याचे भरपूर फायदे आहेत पण तुम्हाला माहित आहे का अंड आपल्या त्वचेसाठी देखील फार उपयोगी आहे. अंड्यामुळे आपल्या त्वचेच्या निगडित अनेक तक्रारी आपण दूर करू शकतो.

अंड हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असून त्याचा आपल्या त्वचेसाठी देखील भरपूर फायदा होतो. अंड खाण्याचे भरपूर फायदे आहेत पण तुम्हाला माहित आहे का अंड आपल्या त्वचेसाठी देखील फार उपयोगी आहे. अंड्यामुळे आपल्या त्वचेच्या निगडित अनेक तक्रारी आपण दूर करू शकतो. अंड्याचा वापर केल्याने आपल्याला त्वचेच्या समस्या कधीच उध्दभवत नाहीत. अंड्यामुळे आपला चेहरा तेलकट ही होत नाही त्याचे कारण म्हणजे अंडी सीबम कंट्रोल(sebum control) करण्यास मदत करतात. आपल्या चेहऱ्यावर पिम्पल्स,(Pimples) ब्लॅकहेड्स (blackheads)काही प्रमाणात येतात ते घालविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. आपल्या चेहऱ्याला आपण विविध प्रकारचे क्रीम (Cream), फेस वॉश (Facewash), फेस मास्क (Facemask), फेस पॅक (Facepack) अशा गोष्टींचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही अंड्यापासून देखील घरच्या घरी फेस पॅक तयार करू शकता. अंड्यापासून तयार केलेला फेसपॅक हा आपल्या त्वचेसाठीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर त्यासाठी अंड्यापासून तयार केलेला फेसपॅक हा अतिशय लाभदायक ठरतो. तसेच ब्लॅकहेड्स (Blackheads) आणि व्हाईटहेड्स (Whiteheads) यावर मुक्ती मिळविण्यासाठी अंड्याचा मोठ्याप्रमाणावर उपयोग केला जातो. चला तर अंड्याचा फेसपॅक कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

अंडी आणि काकडीचा फेसपॅक

अंड्यासोबतच काकडी देखील आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. अंडी आणि काकडीचा फेसपॅक बनविण्यासाठी अंड्याची पांढरा बाजू , एक चमचा मध, आणि त्याचबरोबर एक चमचा काकडीचा रस आणि दही हे एका बाउल मध्ये घेऊन चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. तयार झालेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. जोरजोरात घासून लावण्याची गरज नाही. ही चेहऱ्यावर लावलेली पेस्ट साधारण १५ मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या फेसपॅक मध्ये काकडीचा रस असल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला थंडावाही मिळेल आणि त्याचबरोबर चमकही येईल.

अंडी आणि लिंबाचा फेसपॅक

अंडी आणि लिंबाचा फेसपॅक हा आपल्या त्वचेवरील टॅन त्याचबरोबर डेड स्किन सेल्स (Dead skin cells) कडून टाकण्यासाठी केला जातो. हा फेसपॅक बनविण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग, अर्धा चमचा मध, आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून चांगल्याप्रकारे त्याचे मिश्रण करून घ्या. तयार झालेले मिश्रण आपल्या चेहऱ्यावर साधारण १० ते १५ मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवून टाका.

ब्लॅकहेड्स साठी अंड्याचा वापर

आजकाल ब्लॅकहेडसच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. अंड्याचा वापर केल्याने ब्लॅकहेड्स पूर्णपणे निघून जातात. यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन नंतर टिशू पेपरच्या लहान पट्ट्या बनवा. बनवलेल्या पट्ट्या अंड्यामध्ये बुडवा आणि जिथे ब्लॅकहेड्स असतील तिथे त्या पट्ट्या लावा. काही वेळात पट्ट्या सुकल्यानंतर काढून टाका. असे केल्याने तुमचे चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस निघून जातील.

हे ही वाचा:

मराठी पोरांचा Chennai Super Kings च्या विजयात मानाचा वाटा

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss