Tuesday, April 16, 2024

Latest Posts

विरघळलेल्या आईस्क्रीमपासून बनवा नवीन चविष्ट पदार्थ

लहानमुलांपासून ते अगदी मोठ्यामाणसांपर्यंत आईस्क्रीम हे सर्वांचा आवडते. फार क्वचितच आपल्याला एखादा व्यक्ती बघायला मिळेल ज्याला आइस्क्रीम आवडत नाही. आईस्क्रीम हे प्रत्येकालाच प्रिय असते. आईस्क्रीम हि एक अशी गोष्ट आहे कि जी प्रत्येकालाच खुश करते.

लहानमुलांपासून ते अगदी मोठ्यामाणसांपर्यंत आईस्क्रीम हे सर्वांचा आवडते. फार क्वचितच आपल्याला एखादा व्यक्ती बघायला मिळेल ज्याला आइस्क्रीम आवडत नाही. आईस्क्रीम हे प्रत्येकालाच प्रिय असते. आईस्क्रीम हि एक अशी गोष्ट आहे कि जी प्रत्येकालाच खुश करते. आईस्क्रीमसाठी लहानमुलांसोबतच मोठी माणसं देखील वेडी होतात. प्रत्येकघरात आईस्क्रीम हे जेवल्यानंतर खाल्लं जातं. आईस्क्रीम चे बरेच फ्लेव्हर असतात. त्यामध्ये प्रत्येकाच्य आवडीदेखील वेगवेगळ्या असतात. आईस्क्रीम चे बरेच सर्व्ह करायचे प्रकार देखील असतात जसे कि फॅमिली पॅक, कोनातलं आईस्क्रीम, कपमधलं आईस्क्रीम, पानातलं आईस्क्रीम आणि असे बरेच प्रकार असतात. आपण तसं सगळ्याच ऋतूमध्ये आईस्क्रीम खाण्यास पसंती देतो पण कडक उन्हाळ्यात आईस्क्रीम खायची मज्जाच वेगळी असते. उनहाळ्यात गारेगार आईस्क्रीम खाल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. कडक उन्हामुळे आपल्याला खूप गरम होते आणि घामाच्या धारा निघून आपला जीव वरखाली होत असतो अश्यातच आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. आपण आईस्क्रीम आणल्यावर ते पटकन विरघळून जाते. आईस्क्रीम विरघळू नये म्हणून आपण ते फ्रिज मध्ये ठेवतो. उन्हाळ्यात तर आईस्क्रीम घरापर्यँत आण्याच्या आधीच वितळून जाते. पण ते वितळलेले आईस्क्रीम खाण्यात जरा सुद्धा मजा नाही. आणि ते वितळलेले आईस्क्रीम परत गोठवल्यावर त्या आईस्क्रीमची सगळीच चव निघून जाते. आणि त्याला एक वेगळ्याच प्रकारची चव येते. पण तुमहाला माहित आहे का या वितळलेल्या आईस्क्रीम पासून आपण अन्य पदार्थ बनवू शकतो. आणि ते पदार्थ हि अगदी चविष्ट लागतात. तर जाणून घेऊया हे पदार्थ नेमके आहेत तरी कोणते?

वितळलेल्या आईस्क्रीम पासून ज्युस: (Juice from melted ice cream )

तुम्ही कॅंडी किंवा पोपसिकल्स तर खाल्लेच्च असाल. याच कॅंडी आणि पोपसिकल्स मध्ये दुधाचा समावेश नसतो. कॅंडी आणि पोपसिकल्स मध्ये बरेच फ्लेवर असतात. हे आईस्क्रीम वितळल्यानंतर त्याचा तुम्ही जूस बनवू शकता. आईस्क्रीम मध्ये वेगवेगळे फ्लेवर असल्यामुळे तुम्हाला वेगवगेळ्या फ्लेवर चे ज्युस प्यायला मिळू शकता. लहानमुलांनादेखील हे ज्युस प्रचंड आवडू शकतात. आणि म्हणूच आपले आईस्क्रीम हे वाया जाणार नाही उलट त्याचा उपयोग हा चांगल्याप्रकारेच होईल.

वितळलेल्या आईस्क्रीमचा शेक (Shake from melted ice cream )

आईस्क्रीम वितळल्यावर ते खाण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही वितळलेल्या आईस्क्रीमचा चांगला उपयोग करू शकता. वितळलेल्या आईस्क्रीम पासून तुम्ही शेक बनवू शकता. आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेव्हर असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेव्हरचे शेक बनवता येतील. तुम्ही वितळलेल्या आईस्क्रीमचे शेक बनवून त्याचा मनोसक्त आनंद लुटू शकता.

वितळलेल्या आईस्क्रीमचा केक ( Cake from Melted ice cream)

तुम्हाला माहित आहे का कि तुम्ही वितळलेल्या आईस्क्रीमपासून देखील केक बनवू शकता. वितळलेल्या आईस्क्रीमपासून तुम्हाला चविष्ट केक बनवता येईल. यासाठी तुम्ही वितळलेले आईस्क्रीम हे केक च्या कंटेनर मध्ये किंवा मग मध्ये ओतून घेऊ शकता. आणि मायक्रोवेव्ह मध्ये मस्त बेक करू शकता. त्या केक वर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट करून तो केक खाण्याचा मनोसक्त आनंद लुटू शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

बैलगाडा शर्यतीवर लवकरच येणार नवा चित्रपट, अमोल कोल्हे

महाराष्ट्रीयन मुलीने परदेशात केले मोठे नाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss