हिवाळ्यात ‘हे’ सुपरफूड खाल्याने शरीराला खूप फायदे होतात तर केसांसाठी देखील बरेच फायदे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आणि हृदय, पोट आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 सारख्या पोषक तत्वांचा योग्य समतोल आहे ज्यामुळे स्लीप हार्मोन्स सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचे उत्पादन असल्यामुळे झोप चांगली लागते.
हिवाळ्यातील सुपरफूड:
राताळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामध्ये फायबर्स (आहारातील तंतू) चांगल्या प्रमाणात असतात, जे पचनास मदत करतात. राताळ्यात अँटीऑक्सिडन्ट्स आणि व्हिटॅमिन्स असतात, जे त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. रताळे खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. त्यामुळेच या सुपरफूडचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. रताळे हे साल काढून खातात तर काहीजण रताळे सालीसकट खाणे पसंत करतात. पाहुयात रताळे खाण्याचे फायदे.
रताळे खाण्याचे फायदे :
राताळे हे एक पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ आहे, ज्याचे नियमित सेवन शरीराच्या विविध प्रकारच्या समस्यांवर फायदा करू शकते. राताळे हृदयरोग आणि मधुमेहाच्या धोख्याला कमी करतात, कारण ते शरीरातील द्रव्यांचे संतुलन राखतात. ब्लड शुगर स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचा पातळ कमी होतो. कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम यांसारख्या मिनरल्सने भरपूर असतात, जे हाडे मजबूत बनवतात. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात, कारण ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. हिवाळ्यात रोज रताळे खाल्ल्याने पोटातील चांगल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. हिवाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या वाढतात. त्यामुळे रताळे खाल्ल्याने यापासूनही आराम मिळतो. फायबर-समृद्ध गोष्टींमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव येतो. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका