हिवाळ्यात उष्णतेच्या तापमानात घट होते मात्र लहानमुलांच्या झोपेच्या समस्या वाढतात. हिवाळ्यात वातावरण थंड असल्याकारणाने सूर्यप्रकाशची कमतरता असते यामुळे शरीराच्या सर्कॅडियन लयीमध्ये अडथळा निर्माण करतात जी अनेक शारीरिक कार्ये नियंत्रित ठेवतात. थंड हवा असल्यामुळे श्वसनाच्या कार्यात अडथळे निर्माण होता. रात्रीच्यावेळी हि समस्या जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे लहानमुलांना शांत झोप मिळत नाही. मुलांना रात्रीच्या वेळीस पुरेसा उबदारपणा मिळणे गरजेचे असते. हिवाळ्यात मुलांची त्वचा कोरडी पडते, खाज सुटते, सूज येते त्याचबरोबर त्यांची चिडचिड होते त्यामुळे मुलांना त्वचारोगाचीही समस्या उद्भवू शकते तर अशा प्रसंगी वेळीच काळजी घेणे खूप महत्वाचे असते.
पालकांनो अशी घ्या रात्रीच्या वेळी काळजी –
चांगल्या झोपेसाठी पोषक वातावरणाची गरज असते, झोपण्यापुर्वी किमान 1.5 ते 2 तास आधी सर्व स्क्रीन बंद करा.
मुलांसाठी आरामदायक झोपेचे वातावरण निश्चित करा. ब्लँकेट/रजाईसह योग्य असा उबदार पलंग निवडा.
गरज भासल्यास बाळाच्या खोलीत ह्युमिडिफायर लावा.
आठवडा भर झोपेची वेळ निश्चित करा आणि त्याचे पालन करा.
झोपताना दररोज गोष्टींचे वाचन करण्याची सवय लावा.
रात्री झोपण्यासाठी बाळाला झोपण्यापूर्वी बाळाला स्पंज बाथ घालण्याचा प्रयत्न करा.
मुलाला झोपण्यापूर्वी हलके आणि पोषणतत्त्वांनी भरपूर जेवण द्या. जड जेवण मुलाच्या झोपेवर विपरीत प्रभाव पाडू शकते.
लहान मुलांना टोपी, हातमोज आणि सॉक्सचा वापर करा जेणेकरुन त्यांना उबदारपणा मिळेल.
रात्रीच्या वेळी ते वारंवार जागे होणार नाही याची काळजी घ्या.
रात्री नाक बंद होत असल्यास, झोपेच्या वेळी स्टीम इनहेलेशनसह डोके थोडी उंचावलेल्या स्थितीत नाकावाटे वापरल्या जाणाऱ्या स्प्रे द्या.
याव्यतिरिक्त कोणतीही समस्या असल्यास तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule