३० ऑगस्ट २०२३ आज सगळीकडे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन (Rakshabandhan) हा सण साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. सण म्हंटल की आपण काहीना काही गोड बनवत असतो. यामध्ये काही गोडाचे पदार्थ, मिठाई यांसारखे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. राखी बांधून झाल्यांनतर भावाला गोड काहीतरी भरवण्यासाठी आपण बाजारातून मिठाई घेऊन येतो. काहीवेळा ही मिठाई शिळी किंवा मग कमी किंवा जास्त गोड असते. अशी शिळी मिठाई खाल्यानंतर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण हीच मिठाई जर आपण घरी बनवली तर ती आरोग्यासाठी देखील चांगली असेल आणि घरी सर्वांना आवडेल. या लेखात आपण अशा काही मिठाई बदल जाणून घेऊया.
हलवा:-
रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हलवा बनवून शकता. हलव्यामध्ये गाजरचा हलवा, दुधीचा हलवा, मूगचा हलवा, बदामाचा हलवा किंवा अंजीराचा हलवा तुम्ही बनवू शकता. कमी साखर वापरून हलवा बनवला तर तो चवीलाही छान आणि आरोग्यदायी असेल. वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे हलवे बनवून तुम्ही भावाचे तोंड गोड करू शकता.
अंजीर बर्फी:-
घराच्या घरी सोप्या पद्धतीत तुम्ही अंजीरची बर्फी बनवू शकता. अंजीरमध्ये सिट्युलिन (Citulin), जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals) आणि आहारातील फायबर असतात. अंजीर हे आरोग्यसाठी पौष्टिक असतात. बर्फी बनवताना साखरेचा ऐवजी अंजीचा वर केल्यामुळे बर्फी जास्त गोड होत नाही.
नारळ आणि खजूर बर्फी:-
खजूर हे आरोग्यासाठी चांगले असतात. नारळ आणि खोबऱ्याचा वापर करून बर्फी बनवली जाते. यामध्ये साखरचा ऐवजी खजुराचा वापर केला जातो. खजूर हे गोड असल्यामुळे यात साखरेचा वापर केला जात नाही.
गुलाबजाम:-
गुलाबजाम हा पदार्थ घराचा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे. खावा आणि मैदा वापरून गुलाबजाम बनवले जातात. घरचा घरी कमी साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो.
चिया सीड्स पुडिंग:-
चिया सीड्स (Chia seeds) आरोग्यासाठी चांगले असतात. त्याच्यामध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. हे सीड्स रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर ते आपण दुसऱ्यादिवशी पुडिंग म्हणून खाऊ शकतो.
हे ही वाचा:
मेटा यूजरसाठी मार्क झुकेबर्गने आणले नवीन फिचर
ठाकरे कुटुंबियांवर चढवला नितेश राणेंनी हल्लाबोल