spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

मखाना की पॉपकॉर्न वजन कमी करण्यासाठी नक्की काय खावं? नक्की जाणून घ्या

Makhana Or Popcorn Which Is Best: भूक तर लागली आहे पण वजनही कमी करायचंय, तर अशावेळी लोक मखाना किंवा पॉपकॉर्न खाणं पसंत करतात. जे हेल्दी डाएट फॉलो करत बटाटा चिप्स आणि फास्ट फूड खाणे टाळतात. याव्यतिरिक्त लोक वजन कमी करण्यासाठी हेल्दी ऑप्शन म्हणून मखाना किंवा पॉपकॉर्न निवडतात. पण हे दोन्ही पर्याय हेल्दी आहेतच त्याचबरोबर पोषणांन परिपूर्ण आहे. वजन कमी करण्यासाठी मखाना किंवा पॉपकॉर्न यापैकी कोणते पदार्थ खाऊ शकतात.

मखाणं आणि पॉपकॉर्न या दोन्ही पदार्थांची तुलना केल्यास, वजन कमी करण्याच्या दृष्टीने मखाणं काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. मखाणांमध्ये पॉपकॉर्नच्या तुलनेत कमी कॅलेरीज असतात. मखाणांमध्ये १०० ग्राममध्ये साधारणत: ३५०-४०० कॅलोरीज असतात, तर पॉपकॉर्नमध्ये १०० ग्राममध्ये ४००-५०० कॅलेरीज असू शकतात. मखाणांमध्ये पॉपकॉर्नपेक्षा अधिक प्रथिनं असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. मखाणांमध्ये नैसर्गिक गोडपणा असल्याने ते वजन कमी करण्यासाठी उत्तम असतात, तसेच पॉपकॉर्नमध्ये साखर मखाणांमध्ये अँटीऑक्सिडन्ट्स चांगले प्रमाणात असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पॉपकॉर्नमध्ये अधिक सोडियम असू शकते, खासकरून जेव्हा ते मसालेदार किंवा बटरयुक्त असतात, त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी ते उत्तम नाही, आणि तूप घालून त्याचे कॅलेरीज वाढवले जातात.

मखाणांमध्ये अधिक फायबर्स असतात, जे पचनसंस्थेला मदत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतात. मखाणे कोणत्याही वेळेस खाल्ले जाऊ शकतात, जरी पॉपकॉर्न विशेषतः चित्रपट पाहताना खाण्यासाठी योग्य असतो. मखान्यांना तुम्ही तुमच्या आहाराचा भाग करू शकता. मखाणे खाताना जास्त बटरचा वापर करू नका. हलकं भाजून घ्या आणि मीठ सुद्धा हलक्या प्रमाणात घाला.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss