Saturday, June 3, 2023

Latest Posts

गॅस शेडगी वापरताना ‘या’ चुका करणं तुमच्यासाठी ठरू शकतं जीवघेणं….जाणून घ्या योग्य पद्धत

गॅस शेगडी ह्याचा उपयोग जेवण बनविण्यासाठी रोजच केला. त्यामुळे सवयंपाकघरामध्ये लागणारी ही सर्वात महत्वाची वस्तू मानली जाते. चुलीचा वापर तर शहरातील फ्लॅट सिस्टीम मध्ये करणे शक्यच नाही. त्यामुळे जेवण बनविण्यासाठी गॅस शेगडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

गॅस शेगडी ह्याचा उपयोग जेवण बनविण्यासाठी रोजच केला. त्यामुळे सवयंपाकघरामध्ये लागणारी ही सर्वात महत्वाची वस्तू मानली जाते. चुलीचा वापर तर शहरातील फ्लॅट सिस्टीम मध्ये करणे शक्यच नाही. त्यामुळे जेवण बनविण्यासाठी गॅस शेगडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आजच्या काळात जेवण बनविण्यासाठी इन्डक्शन आणि मायक्रोवेव्ह सारख्या वस्तूंचा पर्याय उपलब्ध आहे पण तरीही या वस्तू घराघरामध्ये वापरल्या जात नाहीत. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये गॅस शेगडी चा वापर होतो. पण तुमहाला माहित आहे का की गॅस शेगडी वारपण्याची योग्य पद्धत असते. चुकीच्या पद्धतीने तुमही गॅस वापरला तर तुमचे नुकसान होऊ शकते. बरेच लोक गॅस शेगडी योग्य पद्धतीने वापरत नाहीत. काही लोक फक्त गॅस शेगडीचे बटन बंद करून बरेच दिवस ते तसाच ठेवतात. गॅस चालू बंद करताना सुद्धा प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. गॅस शेगडी च्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा हा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे गॅस शेगडी चा वापर योग्य पद्धतीने कसा करावा हे जाणून घ्या.

काही लोक हे काडी पटीने गॅस पेटवतात. अनेकजण आधी गॅस शेगडीचे बटण चालू करून ठेवतात आणि नंतर काडीपेटी पेटवून गॅस पेटवतात. पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण बटण जर आधी चालू केले तर गॅस हा हवेमध्ये पसरतो आणि काडीपेटी पेटविल्यानंतर मोठी आग लागू शकते. यासाठी योग्य पद्धत म्हणजे आधी काडीपेटी पेटवा आणी नंतर गॅस शेगडीचे बटण चालू करा.

जर तुमची काडीपेटी पेटत नसेल तर पहिले गॅस बंद करून घ्या. गॅस जर चालूच राहिला तर आग लागू शकते. त्यामुळे थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा. काडीपेटीचा वापर हा टाळावा. काहीवेळस काडीपेटीचा वापर केल्याने धोका निर्मण होऊ शकतो.

तुम्ही गॅस पेटवताना तो नॉर्मल वर ठेवून चालू करावा. गॅस पेटवताना नेहमी सेटिंग कमीच ठेवावे जर गॅस फ्लो (Gas Flow ) जास्त असेल तर तर गॅस तुमच्या अंगावर भसकन येऊ शकतो. एकदा गॅस चालू झाला तर तुम्ही तो तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता. मोठा गॅस ठेवल्याने तुमचा गॅस वाया जाऊ शकतो.

हे ही वाचा:

मनोरंजन क्षेत्रात पुन्हा घडली दुर्दवी घटना…

SSC आणि HSC चा निकाल कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss