सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना त्वचेची काळजी घेणं जमत नाही. हिवाळ्यात मॅनिक्यूअर (हातांची) आणि पेडीक्यूअर (पायांची) करण्याचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्याच्या थंड आणि कोरड्या वातावरणामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो, ज्यामुळे त्वचा रूक्ष आणि तडकू लागते. मॅनिक्यूअर आणि पेडीक्यूअर हिवाळ्यात केल्याने त्वचेची निगा राखता येते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ शकते. मॅनिक्योर आणि पेडीक्योर केल्याने हायड्रेशन मिळवता येते, मसाज आणि मॉइस्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवतात. पण यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सहज घरच्या घरी काही मिनिटात मॅनिक्यूअर आणि पेडीक्यूअर करू शकतात.
कोणत्या पद्धतीने मॅनिक्यूअर आणि पेडीक्यूअर करावं यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप सांगणार आहोत तर नक्की जाणून घ्या.
स्टेप
१. मॅनिक्यूअर आणि पेडीक्यूअर करण्यासाठी सर्वात पहिले नेलपेंट काढून टाकणे गरजेचे आहे.
२. तुम्हाला आवडत्या आकाराप्रमाणे तुम्ही नेलकटरच्या साहाय्याने नख कापून त्यांना शेप द्या.
३. एका टबमध्ये किंवा बदलीमध्ये हातपाय बुडतील एवढं कोमट पाणी घ्या. नंतर त्यात एक शॅम्पो पाकीट आणि कंडिशनर टाका. यासोबत एक अर्धा लिंबू रस टाका. व यानंतर साधारण ५-६ मिनिट हातपाय बुडवून ठेवा. बाहेर काढल्यावर एका मऊ सूती नॅपकिन हातपाय पुसून घ्यावे.
४. घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी ४ चमचे बेकिंग सोडा त्यात २ चमचा कॉफी पावडर, २ चमचा नारळाचे तेल, १ चमचा साखर आणि १ चमचा लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण हातापायांना चांगला स्क्रब करा. ५ मिनिटांसाठी हा पॅक राहू द्या. मग नंतर स्वच्छ कोमट पाण्याने हातपाय हुवा. हा पॅक वापरल्याने टॅन निघून जाईल.
५. घरगुती मास्क तयार करण्यासाठी ४ चमचे तांदळाच्या किंवा बेसनाच्या पिठात हळद आणि दही मिसळून पेस्ट तारात करा. आणि हातपायाला १० मिनिटे लावून ठेवा. नंतर हलक्या हातांनी मसाज करत कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा.
६. हातापायांना मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक चांगला मॉइश्चरायझर लावा. हात मसाज करताना क्रीम हलक्या हाताने पसरवा.
७. शेवटी आपल्या हातापायांच्या नखांना आवडीनुसार नेलं पॉलिश लावा.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका