spot_img
spot_img

Latest Posts

केवळ खोबरेल तेलच नव्हे तर नारळ पाणीही ठरते केसांसाठी फायदेशीर…

नारळ पाणी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. तसेच ते आपल्या केसांसाठी ही खूप फायदेशीर असते. त्यामुळे केसाची मुळे मजबूत होतात. नारळपाणी पिणे हे आपले केस आणि त्वचा दोन्हीसाठी उत्तम ठरते.

नारळ पाणी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. तसेच ते आपल्या केसांसाठी ही खूप फायदेशीर असते. त्यामुळे केसाची मुळे मजबूत होतात. नारळपाणी पिणे हे आपले केस आणि त्वचा दोन्हीसाठी उत्तम ठरते. त्यामध्ये व्हिटॅमिन (vitamin), इलेक्ट्रोलाइट्स (Electrolytes) आणि मिनरल (mineral) असतात. त्यामुळे नारळ पाण्याचा वापर हा केसांसाठी उत्तम आहे. त्यामुळे केस यांच्याशी असलेल्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. तसेच केस मजबूत होतात. नारळ पणीने तुम्ही केस तुटण्यापासून वाचवू शकाल. नारळाच्या पाण्यापासून केस लवकर वाढण्यास मदत होते. केस यांच्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर कश्या प्रकारे करू शकता, जाणून घेऊया.

शाम्पूसह नारळ पाणी (Coconut water with shampoo) –
शाम्पूसह नारळ पाणी घेण्यासाठी अर्धा कप नारळ पाणी घेऊन, त्यामध्ये तुमचा आवडता शाम्पू मिसळा. हे मिश्रण एकजीव करून घ्या. हे एकजीव केलेले मिश्रण तयार झाले की मिश्रण केसांसाठी वापरून केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केस निरोगी राहतात. तसेच , केस खूप सॉफ्ट होतात. त्यासोबत केस ही खूप चमकदार राहतात.

नारळपाणी हे केसांवर स्प्रे करा (Spray coconut water on your hair) –
केसांसाठी तुम्ही नारळाचे पाणी वापरु शकता. स्प्रेची एखाद्या जुनी बाटली स्वच्छ धुवून घ्या आणि त्या बाटलीत नारळपाणी स्प्रे भरून ठेवा. ते नारळ पाणी अधून मधून केसावर स्प्रे करत रहा. त्यामुळे केस निरोगी होतात. त्यासोबत ते खूप वेळ चमकदार राहतात. नारळपाण्याचा स्प्रे तुम्ही कधीही केसावर स्प्रे करू शकता. त्याने केस मऊ राहतात.

नारळाचे पाणी आणि दही (Coconut water and yogurt)
नारळाचे पाणी आणि दही मिक्स करून ही याची केसांसाठी पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट केसावर काही वेळ लावा. यानंतर काही मिनिटे केसाला नीट मालिश करा. हे मिश्रण साधारण अर्धा तास केसावरच राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा. दही आणि नारळाच्या पाण्याची पेस्ट आठवड्यातून एक किंवा दोनदा तुम्ही वापरू शकता.

नारळ पाणी आणि कोरफडाचे जेल (Coconut water and aloe vera gel)
एका वाडग्यात २ चमचे कोरफडाचे जेल घ्या. त्या कोरफड्याच्या जेल मध्ये 2 ते 3 चमचे नारळपाणी मिसळा. हे नीट मिक्स करून ते केसांवर लावा. त्या नंतर केसांना थोडा वेळा मालिश करा. अर्धा तास हे मिश्रण डोक्यावरच राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. या मिश्रणाने केस खूप सिल्की होतातया आणि चमकदार राहतात.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा: 

Healthy And Tasty सोयाबीन थालीपीठ बनवा घरच्या घरी

Health Tips : निरोगी शरीर हवंय? तर रिकाम्यापोटी करा पाण्याचे सेवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss