सध्या कामाच्या वाढत्या ताणामुळे तसेच बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सगळेजण शारीरिक स्वास्थ्याला महत्व देत आहेत. आपल दिसणं, बोलणं, चालणं, फिट दिसण हे प्रत्येकाला आवडाव असे आपल्याला नेहमीच वाटते. यासाठी अनेकजण जिमचा मार्ग निवडतात. भरमसाठ पैसे भरून जिम (Gym) सुरु करतात मात्र असं करून फिट राहणार अस नाही. जिममधील उपकरणांमुळे अनेक जणांना त्रास होतो. अनेक लोकांच्या हातपायांवर सूज येते. त्यामुळे त्यांना जिम सोडावी लागते. मात्र आता चिंता करू नका. यामध्ये काहीना जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य होतं. पण काहींना इच्छा असून ही जिमला जाता येत नाही. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी राहूनसुद्धा व्यायाम ही करू शकता. जर तुम्हाला जिममध्ये न जाता स्वतःला फिट ठेवायचे असेल, तर जाणून घ्या घरच्या घरी कोणते व्यायाम करावे.
दोरी उड्या मारणे सुरु करा (Start jumping rope)
लहानपणी दोरी उड्या मारणे हा प्रकार तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. हा व्यायाम शरीरासाठी खूप चांगला मानला जातो. दोरीने उडी मारल्याने वजन कमी होण्यास आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. फिट राहायचे असेल तर वजन कमी करावं लागेल. या परिस्थितीत तुम्ही घरी किमान १०-१५ मिनिटे दोरीवर उड्या मारायला सुरुवात करावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारत.
योगा करा (do yoga)
वाढत्या वजनामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर रोज योगा करा. यामुळे तुमचे वजन कमी होते. त्यासोबत आरोग्य चांगले राहते. योगासने ही तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करतात. पण तज्ञाचा सल्ला घेऊनच योगा आणि व्यायाम करावा. रोज सकाळी योगा केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता.
आहार आणि व्यायामावर भर द्या (Focus on diet and exercise)
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायामावर तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित करा. आहार योग्य असेल तर त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे नेहमी पौष्टिक पदार्थ खावेत. याबरोबरच रोज व्यायामही करायला हवा. यामुळे नैराश्य आणि तणावासारख्या समस्यांपासूनही खूप आराम मिळू शकतो.
बाहेर फिरायला जा (go for a walk outside)
तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर रोज नियमितपणे बाहेर फिरायला जा. रोज फिरायला गेल्याने वजन ही कमी होऊन आरोग्य चांगले राहते. चालण्याने शरीरात रक्ताभिसरण सुरळीत राहते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका ही कमी होतो. त्यासोबत हृदय नेहमी निरोगी राहते. जर कोणाला जास्त वजनाची चिंता असेल तर त्याने रोज फिरायला जावे.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
हे ही वाचा:
Winter Health Tips हिवाळ्यात का खावेत भाजलेले शेंगदाणे? जाणून घ्या फायदे
Health Tips : हेल्दी आरोग्यासाठी ‘या ‘ tea चे करा सेवन