Friday, March 29, 2024

Latest Posts

कांद्याच्या साली केसांसाठी उपयुक्त….५ मिनिटात बनवा Natural dye

आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस हे भरपूर डॅमेज होतात. सूर्याच्या अतिकिरणांमुळे आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच केसात घाम साचून राहिल्यामुले आपल्या केसात कोंडा तयार होतो. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे आपले केस निरोगी राहत नाही.

आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस हे भरपूर डॅमेज होतात. सूर्याच्या अतिकिरणांमुळे आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच केसात घाम साचून राहिल्यामुले आपल्या केसात कोंडा तयार होतो. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे आपले केस निरोगी राहत नाही. अनेकांना केस गळतीच्या समस्या निर्माण होतात. आजकाल अकाली केस पांढरे होणे हि समस्या कॉमन (Common ) झाली असून त्याची करणेही बरीच आहे. शहरात भरपूर ठिकाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, सततचे बदलते हवामान यामुळे केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अकाली केस पांढरे झाले तर तर कोणालाही आवडत नाही. त्यामुळे केसांना काळं करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. केसांना आपण मेहंदी , कलर (Color) ,डाय (Dye ) लावतो. पण तुम्हाला माहित आहे का यामध्ये भरपूर प्रमाण केमिकल मिसळलेले असतात. हे केमिकल आपल्या केसांना तात्पुरते कळे करतात. व अश्या घातल केमिकल्सचा (chemicals) केसांवर वाईट परिणाम होतो. आणि बाजारात हे प्रोडक्टस (Products) अगदी जास्त किमतीत विकले जातात. असे महागडे प्रोडक्टस वापरून तुम्हाला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल. पण तुम्हाला जर तुमचे केस काळे करायचे असतील तर तुम्ही त्यावर घरगुती उपाय करू शकतात. तुम्ही कांदा चिरून झाल्यावर त्याच्या साली कचऱ्यात फेकून देत असाल पण तसे करू नका. त्या साली तुमच्या केसांसाठी फायदेशीर असतात. तुम्ही त्या सालींचा वापर करून त्याचा नैसर्गिक डाय बनवू शकता. हा नैसर्गिक डाय (Natural dye) वापरल्याने तुमचे केस हे काळे भोर होतात व तुमच्या केसांवर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही. चला तर मग बघूया हा नैसर्गिक डाय बनवतात तरी कसा.

तर सर्वप्रथम तुम्ही कांद्याच्या साली काढून घ्या. साली काढून झाल्यावर एक तुमच्याकडे असलेला तवा घ्या. त्यानंतर गॅस पेटवून तवा गॅस वर ठेवा. आणि त्या तव्यामध्ये साली टाकून भाजून घ्या. त्या साली तव्यावर अगदी काळ्या होई पर्यंत भाजून घ्या. नंतर भाजून झाल्यावर त्या भाजलेल्या सालीं मिक्सर मध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवून घ्या. पावडर तयार झाल्यावर त्यात गुलाबजल घाला आणि त्याचे चांगले मिश्रण तयार करा. ते मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावून घ्या. तुम्ही ते मिश्रण तुमच्या केसांना ब्रशचा वापर करून अथवा ग्लव्हज घालून लावू शकता. आणि एक तास असेच लावून ठेवा. एक तास झाल्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

अश्या प्रकारे तुम्ही नैसर्गिक डाय हा घरच्या घरीच बनवू शकता. हा डाय तुमच्या केसांना खूप उपयुक्त ठरेल. तुम्हा सर्वांना ठाऊकच असेक कि कांद्याचा रस केस वाढण्यासाठी फायदेशीर आहे. पण हा कांद्याच्या सालीचा डाय देखील तुमचे केस काळे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

पी एमच्या खुर्चीवर नामोंची ९ वर्षे;सत्ता नसलेल्या राज्यात आता भाजपचा हैट्रिक प्लॅन

धूम्रपानाच व्यसन लागलाय? ही बातमी नक्की वाचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss