spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

Palak Jowar Roti Recipe : सकाळी तोच तोच नाश्ता करून कंटाळला असाल तर बनवा पौष्टिक पाकल-ज्वारी रोटी, नक्की वाचा रेसिपी

Palak Jowar Roti Recipe : पालक पुरी किंवा पालक सूप याप्रमाणेच बनवा हि पौष्टिक पाकल-ज्वारी रोटी. पालक आणि ज्वारीमध्ये विविध पोषक तत्त्वे असतात, जसे की प्रोटीन, फायबर्स, आणि मॅग्नेशियम. ज्वारी हृदयासाठी चांगली असते कारण ती कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यात उच्च फायबर्सचे स्रोत आहेत, त्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राखेत. ज्वारीमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. पालक मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात, जे हड्ड्यांची मजबुती वाढवतात. पालक आणि ज्वारीमध्ये असलेले पौष्टिक तत्त्व मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करतात आणि स्मरणशक्ती सुधारते. पालक आणि ज्वारीमध्ये असलेल्या जीवनसत्त्व C आणि इतर अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची इम्युनिटी वाढते आणि हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेही ठरते. त्यामुळे हि रेसिपि नक्की करून बघा.

पौष्टिक पाकल-ज्वारी रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

> १ वाटी ज्वारी
> बारीक चिरलेला पालक
> बारीक चिरलेला कांदा
> हिरवी मिरची
> मूग डाळ
> ओवा
> मीठ
> पाणी
> तेल

पौष्टिक पाकल-ज्वारी रोटी बनवण्याची कृती :
पौष्टिक पाकल-ज्वारी रोटी बनविण्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेऊन ते बारीक चिरा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा , बारीक चिरलेली हिरवी मिरची, मूग डाळ, ओवा, चवीनुसार मीठ आणि ज्वारीचे पीठ टाकून हे मिश्रण चांगले हाताने मळून घ्यावे, ताव गरम करून त्यावर तेल टाका आणि तयार केल्याच्या मिश्रणाची रोटी (थालिपीठ) बनवा . तव्यावर हि रोटी दोन्ही बाजूनी खरपुस फाजून घ्या. तयार रोटी तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.

Latest Posts

Don't Miss