spot_img
spot_img

Latest Posts

शारिरीक तंदुरुस्थितीसाठी प्रोटीन गरजेच, जाणून घ्या ‘४’ फायदे

दरवर्षी सप्टेंबरचा महिन्याचा पहिला आठवडा हा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हा दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी खाण्याच्या सवयी आणि योग्य पोषणाचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणणे. हा या सप्ताहाचा उद्देश आहे.

दरवर्षी सप्टेंबरचा महिन्याचा पहिला आठवडा हा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हा दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी खाण्याच्या सवयी आणि योग्य पोषणाचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणणे. हा या सप्ताहाचा उद्देश आहे. या निमित्त शारिरीक तंदुरुस्तीसाठी महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी बनवण्यात प्रथिने खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिने केवळ वजन नियंत्रित राखण्यासाठी आवश्यक नसून त्याच्या सेवनाने स्नायू तयार होण्यासही मदत होते. प्रथिनांसाठी बहुतेक लोक सोयाबिन, चिकन, अंडी, दूध आणि चीज हे आहाराचा महत्वाचा भाग बनवतात, परंतु गेल्या काही वर्षांत व्हे प्रोटीन पावडरची मागणीही खूप वाढली आहे. बॉडी बिल्डिंग करणारे आणि जिममध्ये जाणारे लोक हे व्हे प्रोटीनचा वापर करतात. व्हे प्रोटीन हा एक प्रकारचा सप्लिमेंट (supplement) आहे. जो खाल्ल्याने शरीराला खूप ताकद मिळते आणि नवीन स्नायू तयार होतात. चला तर मग जाणून घेऊया प्रोटीनचे फायदे आणि सेवन कसे करावे.

व्ही प्रोटीन म्हणजे काय ?
दुधामध्ये दोन प्रकारची प्रथिने आढळतात. कॅसिन (Casein) आणि व्हे प्रोटीन (Whey protein) ही प्रथिने दुधात असतात. व्ही प्रोटीन हे दुधापासून वेगळे केले जाऊ शकते. चीज बरोबर जे उपपदार्थ बाहेर पडतात त्याला व्हे प्रोटीन असे म्हणतात. याला सामान्य भाषेत ताक असे म्हणतात. व्ही प्रोटीन हे एक शुद्ध प्रोटीन मानले जाते. कारण त्यात सर्व ९ आवश्यक अमीनो ऍसिड असतात. व्ही प्रोटीन पावडरचा आहारात पाणी, दूध, दही आणि इतर अनेक गोष्टींमध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो. व्ही प्रोटीनमध्ये असलेले घटक व्यक्तीला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवून, शरीराला बळकट करण्यात मदत करतात. व्ही प्रोटीनचे अनेक फायदे आहेत जे जाणून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल.

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत (Help control weight)
वजन आणि स्नायू वाढवण्यासाठी व्ही प्रोटीनचा वापर केला जातो. पण असे नाही कारण वजन कमी करण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिनांची ही गरज असते. जे आपल्याला व्ही प्रोटीनमधून मिळू शकते. व्ही प्रोटीनचे नियमित सेवन केल्याने भूक थोडी कमी होते . मात्र, प्रथिनांचे सेवन करण्यासोबतच नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत (Help increase immunity)
व्ही प्रोटीनमध्ये मुबलक प्रमाणात अमिनो असिड सिस्टीन (Amino acid cysteine) असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास खूप मदत करते. हे ग्लूटाथिओनची पातळी वाढवते. जे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट (Antioxidant) आहे. ग्लूटाथिओन (Glutathione) रोग आणि संक्रमणांशी लढण्यास फार मदत करते.

निरोगी हृदयासाठी फायदेशीर (Beneficial for a healthy heart)
आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हे प्रोटीनचे सेवन देखील केले जाऊ शकते. हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी व्ही प्रोटीन खूप उपयुक्त मानले जाते. यामध्ये ल्युटीन असते जे हृदयरोग कमी करण्यास खूप मदत करते. याच्या नियमित सेवनाने हृदय मजबूत होऊ शकते. व्ही प्रोटीन हे आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा: 

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

कमी साहित्यात बनवा High Protein Dosa

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss