spot_img
spot_img

Latest Posts

Raksha Bandhan 2023, भावाला राखी बांधताना पूजेच्या ताटात ‘या’ गोष्टी घ्या आवर्जून…

बहीण भावाच्या गोड नात्यांचा सण आता जवळ आला आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून हातामध्ये राखी बांधते. भाऊ तिच्या रक्षणाचे वचन तिला देतो.

बहीण भावाच्या गोड नात्यांचा सण आता जवळ आला आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून हातामध्ये राखी बांधते. भाऊ तिच्या रक्षणाचे वचन तिला देतो. बहीण भावाला राखी बांधून त्याचे औक्षण करते. रक्षबंधनाच्या दिवशी बहीण भावला ओवाळते तेव्हा ओवाळणीच्या ताटाला खूप महत्व आहे. ताटात असलेल्या प्रत्येक गोष्टीला महत्वाचे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का या औक्षणाच्या ताटात नक्की काय असत? आणि त्याच मह्त्व काय आहे? चला तर समजून घेऊयात.

कुंकू :-
रक्षबंधनाच्या दिवशी औक्षणाच्या ताटातील कुंकूला खूप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी टिका लावून केली जाते. त्यामुळे रक्षबंधनाच्या दिवशी भावाला कुंकू लावले जाते. भावाच्या माथ्यावर कुंकू लावल्याने ते प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते.

हळद :-
हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हळद ही आरोग्यदायी आहे. त्यामुळे औक्षणाच्या ताटात कुंकवांसोबत हळद असणे आवश्यक आहे.

अक्षता (तांदूळ) :-
अक्षता म्हणजे “आयुष्याची वाढ” असे पुराणात सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. पूजाच्या ताटात अक्षता असणे गरजेचे आहे. त्यामुळे औक्षणाच्या ताटात अक्षतांमुळे आपले आयुष्य पूर्ण होते असे मानले जाते.

नाण- सोनं- सुपारी:-
रक्षबंधनच्या दिवशी भावाच्या कपाळावर टीका लावल्यानंतर नाणे किंवा सुपारी फिरवली जाते. धन-धान्य समृध्दीचे प्रतीक अन् इडा-पिडा टळावी म्हणून सुपारी किंवा नाणं वापल जात. त्यासाठी ताटात सुपारी, सोनं, किंवा नाणं ठेवलं जात.

नारळ :
नारळ या फळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते. भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहावी मानून औक्षणाच्या ताटात नारळ ठेवला जातो.

राखी:-
मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ शांत होतात असा समज आहे. मनगटावरील राखीच्या दोऱ्याने हे सर्व दोष नियंत्रित राहतात असे बोले जाते. राखीही दोऱ्याची नसून ती रेशमी किंवा सुती दोऱ्याची असावी असे बोले जाते.

दिवा :-
औक्षणाच्या ताटात दिवा असणे खूप गरजेचे आहे. वाईट शक्तीपासून भावाचे रक्षण व्हावे आणि भाऊ औक्षवंत राहण्यासाठी ताटात दिवा ठेवला जातो. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

मिठाई :-
कोणत्याही आनंदाच्या वेळी आपण काहींना काही गोड बनवतो किंवा बाहेरून घेऊन येतो. रक्षबंधन हा बहीण भावाचा नात्यातील आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी औक्षण करताना भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणे आवश्यक आहे. बहिण-भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्यात गोडवा कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्व आहे.

हे ही वाचा:

राज्यातील दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल २९.८६, लातूरच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बांगलादेश मधून अटक

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बांगलादेश मधून अटक
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss