Monday, November 13, 2023

Latest Posts

SCHEME FOR WOMEN: काय आहे महिला सन्मान बचत योजना?

प्रत्येकजण भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारत असतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी काही खास योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षेची खात्री मिळते. केंद्र सरकारने ‘महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना खास महिलांसाठी सुरु केली आहे. या योजनेची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केली होती. या योजनेत अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करून बचत करता येते. तसेच, या योजनेत कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते.

महिला सन्मान बचत या योजनेंतर्गत कोणतीही महिला १००० रुपये ते २ लाख इतक्या रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. या योजनेंतर्गत जर नोव्हेंबर २०२३ या वर्षात खाते उघडले तर या योजनेची मॅच्युरिटी २०२५ मध्ये असणार आहे. महिला सन्मान बचत या योजनेंतर्गत तुम्हाला ७.५० टक्के इतक्या व्याज दराचा लाभ मिळू शकेल. महिला सन्मान बचत योजना या योजनेत जर एखाद्या महिलेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर ती मुलगी तिच्या पालकांच्या देखरेखीखाली पोस्त ऑफिसचे खाते उघडू शकते. या खात्यात गुंतवणूक केली तर महिलांना आयकर कलम ८० क च्या अंतर्गत १.५० लाख रुपयांची सूट मिळू शकेल.

महिला सन्मान बचत सर्टिफिकेट या योजनेतखाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ बडोदा किंवा कॅनरा बँकसारख्या अधिकृत बँकांमध्ये खाते उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्म १ भरावा लागेल. खाते उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. अकाउंट होल्डरची इच्छा असल्यास, एक वर्षानंतर महिला बचत योजनेच्या खात्यातून ४० टक्के रक्कम काढता येऊ शकते. खातेदार आजारी पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनंतर ते बंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला ५.५  टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळेल.

हे ही वाचा : 

दिवाळीनिमित्त सोनाली कुलकर्णीच्या खास लूकनं वेधलं लक्ष

हैदराबादमधील केमिकल गोदामाला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss