Somvati Amavasya 2024 Do Or Dont In Marathi : सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) ही एक अत्यंत महत्त्वाची आणि धार्मिक अमावस्या असते. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला एक विशिष्ट महत्त्व असते, परंतु सोमवती अमावस्या सोमवारच्या दिवशी येत असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व अधिक असते. या दिवशी अनेक लोक उपवासी धरतात, व्रत आणि देवी-देवतांची पूजा अर्चा करतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी खास करुन पितरांचे तर्पण आणि श्राद्धकार्ये केली जातात. सोमवती अमावस्येच्या दिवशी काही कामे अत्यंत शुभ मानले जाते. तर नक्की जाणून घ्या या अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारच्या दिवशी येणारी अमावस्या. या वर्षाच्या शेवटची सोमवती अमावस्या ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे. सोमवती अमावस्येला शिव, विष्णु, देवी, व्रतवैकल्यांची पूजा केली जाते. विशेषतः शंकराची पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. शिवपूजनाने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. सोमवती अमावस्या दिवशी पितरांची पूजा करण्याचा विशेष महत्त्व आहे. या दिवशी तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्या केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते, असे देखील मानणे आहे. जाणून घ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
सोमवती अमावस्या कधी आहे :
पंचांगानुसार यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येची तिथी ३० डिसेंबर पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी सुरु होईल, आणि ३१ डिसेंबर पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी समाप्त होईल. या कालावधीत सोमवती अमावस्या साजरी केली जाईल.
सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे :
सोमवती अमावस्या दिवशी पितरांची पूजा करण्याचा विशेष महत्त्व आहे. या दिवशी तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्या दिवशी नद्या आणि तलावांमध्ये स्नान करणे आणि पवित्र जल संकलन करणे शुभ मानले जाते. सोमवती अमावस्येला व्रत करणाऱ्यांना घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळते.शिवमहिम्न स्तोत्र वाचणे किंवा शंकराची आराधना करणं याने विशेष लाभ होतो. सोमवती अमावस्या दिवशी ब्राह्मणांना, गरीबांना दान देण्याचे विशेष महत्त्व आहे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करू नये :
सोमवती अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणतेही वाद-विवाद आणि तक्रारी होऊ नयेत. घरात शांतता आणि सौम्यता असावी. सोमवती अमावस्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळले पाहिजे, कारण हे धार्मिक दृष्ट्या वर्ज्य मानले जाते. अहंकार आणि दुराभिमान टाळावा. हा दिवस एकता आणि समर्पणाचा असावा. घरातील आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. अशुद्धता आणि गडबड टाळा. स्वच्छतेची पूजा समजली जाते.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका