Star Fruit: स्टार फ्रूट तुम्ही आयुष्यात तुम्ही कधी ना कधी खाल्लं असेल. शाळेबाहेर बोरांची गाडी घेऊन उभा असलेल्या फेरीवाल्याकडे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. स्टार फ्रुट अतिशय चवदार, आंबट-गोड चवीला असे काहीसे असते.ज्यावेळी आपण स्टार फ्रुटला कापतो.त्यावेळी ते फळ ताऱ्यासारखे दिसते. त्यामुळेच याला स्टार फ्रुट (Star Fruit) म्हणतात. स्टार फ्रुटचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आंबट, गोड आणि तुरट अशी त्याची चव लागते. या फळाचे तुम्हाला आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?
स्टार फ्रूटमध्ये बरेच आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. स्टार फ्रुटला फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ५, कॅल्शियम, सोडियम, फोलेट, कॉपर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. या फळातील व्हिटॅमिन बी ६ पचनक्रिया व्यवस्थित करण्यास मदत करते. यामुळे कॅलरीज (calories) देखील बर्न होतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने रोग प्रतिकार शक्ति वाढते. स्टार फ्रूटमधील व्हिटॅमिन सी (Vitamin C) त्वचेला निरोगी ठेवते आणि ती भेगा पडण्यापासून रोखते. १०० ग्रॅम स्टार फ्रूटमध्ये अंदाजे २. ८ ग्रॅम फायबर असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवते. गॅस आणि अॅसिडिटीपासून (Acidity) आराम मिळतो. बद्धकोष्ठता कमी होते. स्टारफ्रूटमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तपुरवठा सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि उच्च रक्तदाब कमी करते. हृदयाचे आरोग्य सुधारते. स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) देखील जास्त असते. फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर डोळ्यांचे संरक्षण देखील करते. दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी ६ मेंदूचे कार्य सुधारते. यामुळे मेंदू सक्रिय आणि उत्तेजित होतो. यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही. तसेच काम करण्याची ऊर्जा मिळते.
कॅन्सरकरता (Cancer) हे फळ खूप फायदेशीर आहे. आपण या फळाचे सेवन जर रोज केले तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करू शकतो.त्याचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. स्टार फ्रुटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीराचे मेटॅबाॅलिझम वाढते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.या फळात कॅलरीज देखील कमी असतात. त्यामुळे या फळाचा समावेश तुम्ही आहारात करू शकता. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढतात आणि ईम्यून सिस्टम मजबूत राहते. स्टार फ्रुटचे सेवन करणे देखील हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. या फळांमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रीत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणात व्यत्यय येत नाही आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. भरपूर पोषकतत्त्वे असलेल्या स्टार फ्रुटचे सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. परंतु स्टार फ्रुटचे सेवन किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. स्टार फ्रुटमध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचा पदार्थ असतो. जे किडनीच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात. स्टार फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट, लोह, जस्त, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे गुणधर्म आढळतात. शास्त्रज्ञांचे मत आहे की, स्टार फ्रुट खाल्ल्याने अस्थमा सारख्या श्वसनाच्या समस्या दूर होतात.स्टार फ्रुटच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकते. कारण यात सॉल्यूबल फायबर असते.
हे ही वाचा:
Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या
Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा