Tuesday, June 6, 2023

Latest Posts

सनस्क्रीनचा उपयोग केसांनाही होतो …… जाणून घ्या फायदे

सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वचेचं खूप नुकसान होत. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. अगदी कडक उन्हामुले आपल्या त्वचेवर रॅशेसही उठतात. आपल्या त्वचेवर टॅन येतो. उन्हामुळे आपल्या संवेदनशील त्वचेवर होणारे परिणाम टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लावतो आणि उन्हाच्या कडक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतो.

सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वचेचं खूप नुकसान होत. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. अगदी कडक उन्हामुले आपल्या त्वचेवर रॅशेसही उठतात. आपल्या त्वचेवर टॅन येतो. उन्हामुळे आपल्या संवेदनशील त्वचेवर होणारे परिणाम टाळण्यासाठी आपण आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लावतो आणि उन्हाच्या कडक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतो. सनस्क्रीन आपल्या त्वचेचं रक्षण करते. सनस्क्रीन लावल्यामुळे सूर्याच्या किरणांचा आपल्या त्वचेवर होणार परिणाम कमी दिसून येतो. संक्रिन हे आपल्या त्वचेचं संरक्षक कवच म्हणून काम करते. प्रत्येकाने आपल्या संवेदनशील त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रिनचा वापर केलाच पाहिजे. सूर्याची किरणे आणि खास करून UV किरणे हे आपल्या त्वचेचं जास्त नुकसान करतात. सनस्क्रिनचा वापर करणे हे आपल्या त्वचे संबंधित इतर काही समस्या पासूनही सुटका करू शकते. आपली त्वचा हि निरोगी राहण्यासाठी आपण सनस्क्रीन चा वापर केला पाहिजे. सनस्क्रीन हे केवळ उन्हापासूनच नाही तर त्वचेच्या सर्व आजारांपासून आपले संरक्षण करते. म्हणूनच आपण बाहेर जाताना केवळ चेहऱ्यालाच नाही तर सर्व भागाला सनस्क्रीन लावले पाहिजे. आणि त्या सर्व भागांमध्ये आपण केसांचाही समावेश केला पाहिजे. होय, तुम्ही बरोबर वाचल आपण सनस्क्रीन केसांनाही लावू शकतो.

सनस्क्रीन हे त्वचेप्रमाणेच केसांनाही फायदेशीर ठरते. सनस्क्रीन हे उन्हापासून आपल्या केसांचे आणि स्कॅल्पचे देखील संरक्षण करतो. आपले केस हे उन्हाच्या तीव्र किरणांपासून डॅमेज होऊ शकतात. पण जर आपण केसांना सनस्क्रीन लावले तर आपले केस डॅमेज होण्याप्सून वाचू शकतात. केसांचे सुद्धा उन्हापासून, धुळींपासून तसेच वाढत्या प्रदूषणापासून प्रचंड नुकसान होते. त्यामुळे केसांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे हे अनिवार्य आहे.

केसांना सनस्क्रीन लावण्याचे फायदे पुढीलप्रमाणे

सूर्यकिरणांपासून संरक्षण

सनस्क्रीन हे तुमच्या केसांचे उन्हाच्या घातक किरणांपासून संरक्षण करते. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन त्वचेप्रमाणेच केसांनाही लावणे आवश्यक आहे. सनस्क्रीन हे तुमच्या केसांचे संरक्षण करून त्यांना खराब होण्यापासून वाचवते. त्याचबरोबर नियमित सनस्क्रीन लावून आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. सनस्क्रीन मुळे आपले केस निरोगी राहतात.

केसांची चमक टिकून राहते

सध्या प्रदूषण खूप वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे केसांनाही त्वचेप्रमाणेच खूप हानी पोहोचते. पूर्ण दिवस बाहेर उन्हामध्ये असल्यामुळे आपले केस डॅमेज होतात. आणि त्यामुळेच आपल्या केसांची संपूर्ण चमक निघून जाऊ शकते. त्यासाठी सनस्क्रीन लावणे हे अत्यंत गरजेचं आहे.

केसांमधील ओलावा टिकून राहतो.

सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्या केसांमधले तेल निघून जाऊन आपले केस कोरडे होतात. पण तुम्ही जर नियमितपणे केसांना सनस्क्रीन लावून बाहेर पडलात तर तुमच्या केसातील ओलावा कायम राहतो. सनस्क्रीन केसांमध्ये ओलावा निर्माण करतो. त्यामुळे आपले केस कडक उन्हामध्ये सुद्धा मुलायम राहतात.

सनस्क्रीन केसांना कसे बरं लावणार?

सर्वप्रथम सनस्क्रीन केसांना लावण्यापूर्वी सर्वात पहिले केस स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर केसांना चांगल्याप्रकारे पशुसन घेऊन कोरडे होऊ द्या. केस कोरडे झाल्यानंतर केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन लावण्यासाठी तुम्ही स्प्रे चा सुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे सनस्क्रीन तुमच्या स्कॅल्पपर्यंत पोहचू शकते.
अशा तर्हेने तुम्ही केसांना सनस्क्रीन लावून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

सावधान! चुकीच्या पद्धतिने ब्लॅकहेड्स काढतायतं? चेहऱ्यावर पडू शकतात कायमचे डाग

IRS समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

Mothers Day2023, मदर्स डेच्या दिवशी surprise gift देऊन करा आईला चकित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss