Friday, December 1, 2023

Latest Posts

पॅनिक अटॅक (Panic attack) पासून स्वतःची अशी काळजी घ्या, मानसिक शांततेसाठी सर्वोत्तम पर्याय

पॅनिक अटॅक (Panic attack) पासून स्वतःची अशी काळजी घ्या, मानसिक शांततेसाठी सर्वोत्तम पर्याय

आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल सतत चिंता किंवा तणाव जाणत असतो. कधी कधी अधिक कामाच्या तणावामुळे देखील जास्त प्रमाणात तणाव जाणवतो. यावेळी चिंता आणि तणाव यांना कधीच हलक्यात घेण्याची चूक करू नका. या गोष्टी हलक्यात घेतल्याने अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकी एक समस्या म्हणजे ‘पॅनिक अटॅक(Panic attack). एखाद्या गोष्टीमुळे खूप चिंता केल्याने पॅनिक अटॅक देखील येऊ शकतो. पॅनिक अटॅक हा अचानक झालेला हल्ला आहे. हा अटॅक अतिशय वेदनादायक देखील असू शकतो. हा इतका भयानक असतो की हा झटका हृदयविकाराच्या झटक्या इतका असू शकतो ज्यामध्ये रुग्ण स्वतःवरील नियंत्रण गमावतो. पॅनिक अटॅक हा जास्त काळासाठी राहत नसला तरी त्याचा आपल्या जीवन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा पॅनिक अटॅक कसा हाताळायचा हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

पॅनिक अटॅकला सामोरे जाण्याचे मार्ग कोणते?

शारीरिक हालचाल करा-

जर तुम्हाला याआधी कधीही पॅनिक अटॅक आला असेल, तर ही परिस्थिती पुन्हा टाळण्यासाठी शारीरिक व्यायामाला तुमच्या दिवसभराच्या रुटिनचा एक भाग बनवा. शारीरिक हालचाली केल्याने एंडोर्फिन हार्मोन्स (endorphins hormone) बाहेर पडतात, ज्यामुळे मनःस्थिती सुधारण्यास मदत होते आणि मन देखिल शांत होते. तणाव आणि चिंता कमी केल्याने, पॅनिक अटॅकचा धोका देखील फार प्रमाणात कमी होतो. त्यामुळे या हालचाली सतत करत राहणे आवश्यक आहे.

दीर्घ श्वास घ्या आणि तो श्वास मोजत राहा-

तुमच्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येत असल्यास, त्यांना एका जागी बसायला सांगा आणि दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू तो श्वास मोजायला सांगा. जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर तुम्हाला हा उपाय स्वतःच करून पाहावा लागेल. आत आणि बाहेर एक दीर्घ श्वास घ्या आणि हा श्वास सामान्य होईपर्यंत मोजत राहा, त्यामुळे पॅनिक अटॅक तुम्ही टाळू शकता.

थंड पाण्याने किंवा बर्फाने स्वतःला ओले करा-

पॅनिक अटॅकमध्येही थंड पाणी खूप फायदेशीर ठरते, त्याने आराम देखील मिळतो. पॅनिक अटॅक आल्यास चेहरा पाण्याने स्वछ धुवावा. जर ते पाणी थंड असेल तर अजूनच चांगले. चेहऱ्यासह मान पुसून टाका. थंड पाण्यात टॉवेल भिजवावा आणि तो डोक्यावर ठेवावा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो .

Latest Posts

Don't Miss