Wednesday, April 24, 2024

Latest Posts

बडीशेपचे हे आहेत फायदे; केसगळतीवर देखील फायदेशीर

बडीशेपचा फायदा हा फक्त पचनासाठी देखील नाही तर आपल्या आरोग्याशी निगडित अनेक गोष्टींसाठी केला जातो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जेवणानंतर बडीशेपचे सेवन करतो. बडीशेपमुळे आपण केलेल्या आहाराचे लवकर पचन होते.

बडीशेपचा फायदा हा फक्त पचनासाठी देखील नाही तर आपल्या आरोग्याशी निगडित अनेक गोष्टींसाठी केला जातो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जेवणानंतर बडीशेपचे सेवन करतो. बडीशेपमुळे आपण केलेल्या आहाराचे लवकर पचन होते. पण तुम्हाला माहित आहे बडीशेपचा वापर केल्याने आपल्या आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होतात. आजकाल प्रत्येकालाच केसगळतीच्या त्याचबरोबर त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यावर अनेक उपाय करूनही आपल्याला फारसा फरक जाणवत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का अश्या समस्यांवर बडीशेप प्रभावी पडते. त्याचेकारण म्हणजे बडीशेपही अनेक औषधी गुणांपासून समृद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया बडीशेपचे सेवन केल्याचे फायदे.

केसगळती थांबते:

बहुतेकांना केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे केस गळतीच्या समस्या वाढल्या आहेत. बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. बडीशेपमध्ये अँटी ऑक्सिडंट असते ते आपल्या केसांची मूळ मजबूत करतात व आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळते. तुम्हाला केसगळतीची समस्या दूर करायची असेल तर बडीशेप गरम पाण्यात उकळवून घ्यावी आणि ते पाणी थंड करत ठेवावे. त्यानंतर थंड झालेल्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे.

चेहऱ्यावरील मुरमे दूर होतात:

बडीशेपच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरुमे निघून जातात. मुरमाच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी बडीशेपच्या बियांची पावडर मधात किंवा ताकात मिसळवून त्याची व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यावी. तयार झालेली पेस्ट साधारण १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

चरबी कमी होते:

बडीशेपचा वापर आपल्या शरीरातील चरबी काढण्यासाठी केला जातो. बडीशेपमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी बडीशेप पाण्यात मिसळवून त्याची पेस्ट बनवून घ्यावी व जेथे अतिरिक्त चरबी आहे तेथे लावावी.

चेहऱ्यावर चमक येते:

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करतो. बडीशेपच्या साहाय्याने आपण आपल्या चेहऱ्यावरील गेलेली चमक परत आणू शकतो. आपला चेहरा चमकदार बनविण्यासाठी ओटमील आणि बडीशेप पाण्यात घालून ते गरम करावे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यावी. बनवलेली पेस्ट १० तर १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

हे ही वाचा : 

अशाप्रकारे बनवा कैरीची आंबट गोड चटणी; जाणून घ्या संपूर्ण रेसिपि

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss