spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही खास योगासने अधिक फायदेशीर…

आपल्या शरीराला योगासनांचा खूप फायदा होतो. रोज योगा केल्याने आपल्या शरीरातील ताणतणाव नाहीसा होतो. योगासने लहान व प्रौढ माणसांच्या आरोग्यास चांगले आहे.

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्व काम करतो परंतु स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. यासाठी योगा (Yoga) हे उत्तम आहे. आपल्या शरीराला योगासनांचा खूप फायदा होतो. रोज योगा केल्याने आपल्या शरीरातील ताणतणाव नाहीसा होतो. योगासने लहान व प्रौढ माणसांच्या आरोग्यास चांगले आहे. शारीरिक (physical) आणि मानसिक (mental) आरोग्य सुदृढ राहावे यासाठी योगा हा अत्यंत महत्वाचा असतो. योगा केल्याने विशेषतः लहान मुलांना चपळता राहते आणि त्याचे आरोग्य चांगले राहते. लहानपणापासून मुलांना योगासनाचे करायला लावले तर त्याचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. योग हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग असावा. आज आपण जाणून घेऊया की, लहान मुलांची कोणती सोपी योगासन आहेत. ज्यामुळे त्यांचे शरीर लवचिक राहते.

भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासन या योगासनांच्या प्रकाराला क्रोबा पोज (croba pose) देखील म्हटले जाते. भुजंगासन हा योग प्रकार करणे अतिशय सोपे आहे. सुरुवातीला तुम्हाला पोटावर झोपावे लागते. त्यानंतर हाताचे दोन्ही तळवे दोन्ही बाजूला ठेवून. पोटाच्या वरचा भाग हवेत वर उचलावा लागतो. तर खालचे शरीर जमिनीवर राहते. हे आसन करताना डोके हे मागच्या बाजूला ठेवावे.

ताडासन (Tadasana)

लहान मुलांना ताडासन हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. हा योग उंची वाढवण्यासाठी देखील केला जातो. ताडासन करताना सर्वप्रथम सरळ उभे राहावे. त्यानंतर हात वरती करून शरीर वरच्या दिशेने खेचावे. त्याच वेळी पायाचे तळवे हे जमिनीला स्थिर राहतात. असं करताना हळू हळू श्वास घेऊन सोडावा. हे असं काही वेळ केल्यावर पुन्हा सामान्य स्थितीत यावे.

मार्जरी आसन (Marjorie Asan)

लहान मुलांना चांगल्या आरोग्यासाठी आणि लवचिक राहण्यासाठी मार्जरी आसन चांगले आहे. यालाच ‘कोट पोज’ (coat pose) देखील म्हटले जाते. योगासन करताना गुडघे टेकवून जमिनीला बसावे. कंबर पुढील बाजूस वाकवून दोन्ही हाताने तळवे जमिनीला टेकवावे. डोके देखील वाकलेले असावे. मनगट, कोपर आणि खांदे जमिनीच्या सरळ रेषेवर असावे. हे योगासन केल्याने मणक्याला व मानेला विशेष फायदा होतो.

हे ही वाचा: 

संतप्त कार्यकर्त्यांकडून धुळे – सोलापूर महामार्गावर जाळपोळ

‘सुभेदार’ची घौडदौड सुरुच, पहिल्याच विकेंडला जमवला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss