Thursday, March 28, 2024

Latest Posts

चेहयावरील Makeup काढण्यासाठी या गोष्टी ठरतील फायदेशीर..

आपण बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याला मेकअप (Makeup) करतो. मेकअप केल्याने आपला चेहरा अधिकच खुलून दिसतो.

आपण बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याला मेकअप (Makeup) करतो. मेकअप केल्याने आपला चेहरा अधिकच खुलून दिसतो. आपल्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. मेकअपचा वापर आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. आजकाल लोक दैनंदिन जीवनात मेकअपचा वापर करतात. मेकअप करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रोडक्टस (Products) वापरतो. त्या प्रोडक्टस मध्ये भरपूर प्रमाणात केमिलकचा (Chemicals) वापर केला जातो. हे केमिलक्स आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय हानिकारक असतात. आपण जर आपल्या चेहऱ्यावर मेकअप जास्त काळ ठेवला तर आपल्या त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मेकअप व्यवस्थितपणे निघून जाणे गरजेचे आहे. म्हणूच झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढून झोपावे. बहुतेकजण फक्त पाण्याने मेकअप काढतात पण फक्त पाण्याचा वापर केल्याने मेकअप निघून जात नाही. मेकअप पूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोरफड (Aloevera )

कोरफडचा वापर करून आपल्या चेहऱ्यावरील मेकअप निघून जाऊ शकतो. कोरफड आपल्या त्वचेसाठी भरपूर फायदेशीर आहे. कोरफडमध्ये आपल्या त्वचेसाठी त्याचबरोबर केसांसाठी उपयुक्त असलेले घटक मोठ्या प्रमाणावर असतात. मेकअप पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. चेहऱ्यावर कोरफड जेल लावून चेहऱ्यावरील मेकअप अगदी सहजरित्या निघून जाऊ शकतो. कोरफडाच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही.

खोबरेल तेल (Coconut Oil)

खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल हे एक नैसर्गिक मेकअप रिमूवर (Makeup remover) म्हणून काम करते. नारळाच्या तेलात फॅटी ऍसिड (fatty acids) असून ते आपल्या त्वचेच्या आत जाऊन आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर करतात . मेकअप काढून टाकण्यासाठी कॉटन (Cotton) मध्ये थोडे नारळाचे तेल घेऊन आपल्या चेहऱ्यावरून फिरवावे. अशाप्रकारे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व मेकअप निघून जाईल आणि तुमची त्वचा मुलायम होईल.

ऑलिव्ह ऑइल ( Olive oil)

ऑलिव्ह ऑईलचा उपयोग हा मेकअप काढण्यासाठी देखील केला जातो. मेकअप काढण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलची मदत घेऊन तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप सहजरित्या काढू शकता. मेकअप काढण्यासाठी तुम्ही कॉटनमध्ये ऑलिव्ह ऑइल घ्या.

हे ही वाचा : 

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

रुळावरून घसरलेली रेल्वे अशाप्रकारे परत रुळावर आणली जाते; जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss