Friday, April 19, 2024

Latest Posts

फुलांपासून बनविला जातो ‘हा’ चहा; आरोग्यासाठी आहे फायदेशीर

प्रत्येकाला चहा हा खूप प्रिय असतो. बहुतेक जणांचा दिवस हा चहा प्यायल्या शिवाय सुरु होत नाही. चहाचे सेवन केल्यावर आपल्याला फ्रेश (Fresh ) वाटते. बहुतेक जण तरतरी येण्यासाठी चहा पिण्यास प्राधान्य देतात. चहाचे सुद्धा प्रकार आहेत जसे कि ग्रीन टी (Green tea ), हर्बल टी (Herbal tea ), ब्लॅक टी (Black tea) तसेच दुधाचा चहा.

प्रत्येकाला चहा हा खूप प्रिय असतो. बहुतेक जणांचा दिवस हा चहा प्यायल्या शिवाय सुरु होत नाही. चहाचे सेवन केल्यावर आपल्याला फ्रेश (Fresh ) वाटते. बहुतेक जण तरतरी येण्यासाठी चहा पिण्यास प्राधान्य देतात. चहाचे सुद्धा प्रकार आहेत जसे कि ग्रीन टी (Green tea ), हर्बल टी (Herbal tea ), ब्लॅक टी (Black tea) तसेच दुधाचा चहा. बहुतांश लोक आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात दुधाच्या चहाचे सेवन करतात. वजन कमी करण्यासाठी तसेच इतर अनेक फायद्यांसाठी लोक ग्रीन टी, ब्लॅक टी आणि हर्बल टी चे सेवन करतात. अनेक लोकांची चहा प्यायल्याशिवाय कोणतीच कामे होत नाहीत. पण तुम्ही कधी ब्लु टी (Blue Tea ) बाबत ऐकले आहे का? ब्लु टी हा ग्रीन टी, हर्बल टी प्रमाणेच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ब्लु टी चे भरपूर फायदे आहेत. चाल तर मग जाणून घेऊया या ब्लु टी बाबत.

ब्लु टी हा फुलांपासून बनविला जातो. तुमहाला माहित आहे का ब्लु टी ला बटरफ्लाय टी (Butterfly Tea) असे म्हंटले जाते. त्याचे कारण म्हणजे हा चहा ब्लु बटरफ्लाय म्हणजेच अपारीजाताच्या फुलांपासून बनविला जातो. अपारीजाताचे फुल हे निळ्या रंगाचे असते. अपारीजाताची फुले ही प्रामुख्याने मलेशिया, थायलंड, बाली, व्हिएतनाम या देशांमध्ये दिसून येतात. अपरिजाताच्या फुलांचे अनेक फायदे आहे. अपरिजाताच्या फुलापासून बनवलेला ब्लु टी आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी सुद्धा भरपूर फायदेशीर आहे. आजकाल हा ब्लु टी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला असून लोकांच्या पसंतीस येत आहे. चला तर मग या ब्लु टी (blue tea) चे आपण फायदे पाहुयात.

ब्लु टी चे फायदे पुढीलप्रमाणे:

प्रतिकारशक्ती वाढते: (Increases immunity)

ब्लु टी चे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. ब्लु टी चे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. त्यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे ब्लु टी मध्ये अँटी इंफ्लेमेटरी हा गुणधर्म देखील असतो. या चहामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात वाढते. त्यामुळे आपण लहानमोठ्या आजारांपासून दूर राहतो.

स्मरणशक्ती वाढते: (Memory increases)

ज्या लोकांच्या गोष्टी लक्षात राहत नाही त्यांनी या ब्लु टी चे सेवन केले पाहिजे. त्याचे कारण म्हणजे ब्लु टी चे सेवन केल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. जे लोक अल्झायमरचा आजार असेल त्यांनी ब्लु टी चे सेवन नियमित केले पाहिजे. ह्या चहा चा उपयोग ताण तणाव कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो.

मधुमेहावर नियंत्रण: (Control on diabetes) 

मधुमेह असलेल्यांची ह्या चहाचे सेवन करायला काहीच हरकत नाही. त्याचे कारण म्हणजे ब्लु टी चे सेवन केल्यावर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे ब्लु टी चे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.

डोळ्यांसाठी लाभदायक: (Good for eyes)

ब्लु टी च्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आपली दृष्टी वाढते. या चहाचे नियमित सेवन केल्याने ज्या काही डोळ्यांशी निगडित समस्या असतात त्या दूर होतात. आपली दृष्टी ही चांगली होते. त्यामुळे ब्लु टी चे सेवन सगळ्यांनी करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : 

“तो” फोटो पाहून राज ठाकरे झाले भावुक …

Accident च्या प्रमाणात वाढ! करा ‘या’ गोष्टींचे पालन | Follow ‘these’ things |

Vat Pournima 2023: वट पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हे’ घ्या खास उखाणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss