Friday, March 29, 2024

Latest Posts

Tiffin ला वास येतोय? आजमवा हे ४ उपाय

अन्न हे पुर्णब्रह्म असतं. परंतु अनेक वेळा हेच अन्न आपण टिफिनमध्ये ऑफिसला किंवा कुठे बाहेर घेऊन जातो, तेव्हा टिफिनला अन्नाचा वास लागतो.

अन्न हे पुर्णब्रह्म असतं. परंतु अनेक वेळा हेच अन्न आपण टिफिनमध्ये ऑफिसला किंवा कुठे बाहेर घेऊन जातो, तेव्हा टिफिनला अन्नाचा वास लागतो. अनेक वेळा टिफिन चांगला धुवून सुद्धा हा वास जात नाही. त्यामुळे कालांतराने टिफिनला तसेच डब्ब्याला दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास होतो. तसेच टिफिन मध्ये पुन्हा भरलेल्या अन्नाला त्याचा वास लागतो. व ते पुन्हा भरलेले अन्न आपल्याला खाववत नाही. मसालेदार करी, तीव्र वास असणारे घटक,या गंधांपासून टिफिन मुक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही ४ असे उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही टिफीनमधून येणारे हे वास प्रभावीपणे दूर करू शकता. चला तर मग ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.

कच्चा बटाटा

टिफिन मधून तसेच जेवणाच्या डब्यातून येणारा तिखट वास दूर करण्यासाठी बटाटा हा एक उत्तम पर्याय आहे. एक कच्च बटाटा घेऊन त्याचे जाड काप करून वास येणाऱ्या जागेवर घासल्याने येणारा वास कमी होण्यास मदत होईल. बटाट्यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम वास निष्प्रभ करण्यास मदत करतात. बटाटा चोळल्यानंतर त्याचे काप टिफिनच्या आत ठेवा आणि झाकण बंद करा. रात्रभर बटाटा ठेवल्यास उरलेला गंध शोषला जाईल. उरलेला वास घालवण्यासाठी साध्या लिक्विड सोपने डबा पुन्हा एकदा धुवून घावा

दालचिनी

दालचिनी ही विशेषतः आनंददायी सुगंध तसेच नैसर्गिक दुर्गंधीनाशक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ज्यामुळे टिफिनमधील तीव्र गंध दूर करण्यासाठी ती एक प्रभावी घटक ठरते. रिकाम्या टिफिनमध्ये एक किंवा दोन दालचिनीच्या काड्या ठेवून झाकण घट्ट बंद करावे. दालचिनीची काडी तीव्र गंध शोषून घेते व डब्यात सुगंध राहतो. किंवा तुम्ही दालचिनीची पावडरही वापरू शकता. टिफीनमध्ये दालचिनीची पावडर टाकून झाकण घट्ट लावा आणि डबा हलवा. त्याने गंध शोषला जाईल. नंतर डबा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

लिंबांच्या सालांचा वापर

टिफिनमधून येणारा तिखट वास दूर करण्यासाठी लिंबाची साल एक चांगला नैसर्गिक उपाय आहे.वापरण्यात आलेल्या लिंबाचे साल फेकून न देता गोळा करा व ते पूर्णपणे स्वच्छ धुवा. रिकाम्या टिफिनमध्ये लिंबाची काही साले टाका आणि झाकण घट्ट बंद करून रात्रभर तसेच ठेवा. लिंबाची साले डब्यातील वास शोषून घेतील.

व्हिनेगरचा वापर

जर तुमच्या टिफिनला उग्र वास येत असेल तर व्हिनेगरचा वापरही मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतो. वास येणारा डबा पूर्णपणे रिकामा करून घ्यावा. व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे . या मिश्रणात टिफीन १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्याने दुर्गंध कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर ब्रश किंवा स्पंजने डबा घासून स्वच्छ करावा व कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

Latest Posts

Don't Miss