Monday, June 5, 2023

Latest Posts

जाणून घ्या तणाव कमी करण्यासाठी काही महत्वाचे उपाय

रोजच्या जीवांमध्ये आपण एवढे व्यस्त असतो. रोजच्या जीवनशैलीमध्ये कामाच्या ठिकाणचे वातावरण अत्यंत वेगवान आणि नेहमीच आपल्या समोर नवनवीन मागण्या येत असतात.

रोजच्या जीवांमध्ये आपण एवढे व्यस्त असतो. रोजच्या जीवनशैलीमध्ये कामाच्या ठिकाणाचे वातावरण अत्यंत वेगवान आणि नेहमीच आपल्या समोर नवनवीन मागण्या येत असतात. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी येणारा तणाव हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपल्या ऑफिसमध्ये डेडलाइन पूर्ण करण्यासाठी ते वेगवेगळ्या स्वभावांच्या सहकाऱ्यांशी जमवून घेणे इतपत या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाच्या संबंधित ताण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतो. या तणावाला दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कामाच्या ठिकाणी येणाऱ्या तणावाचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकता. तणाव कमी असल्यावर आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. जर आपल्याला आपल्या तणावाचे व्यवस्थापन करायचे असेल तर आपले विचार, भावना आणि संवेदनांच्या बाबतीत निर्णय न घेता परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती असणे फार गरजेचे आहे.

तणाव कमी करण्यासाठी काही उपाय –

मन लावून चालणे –
तुम्हाला जर कामामध्ये अडचणी येत असतील तर थोडा ब्रेक घ्या आणि मग चालायला जा. तुम्ही जेव्हा चालत असताना तुमच्या पायांचा जमिनीला होणाऱ्या स्पर्शाला संवेदना आणि तुमच्या शरीराच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या परिसरामध्ये आहेत तेथील आसपासचा निसर्ग,, आवाज आणि वास लक्षात घेऊन तुमच्या सभोवतालच्या परिसराचा आनंद घ्या त्यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत होईल.

 

श्वासावर लक्ष केंद्रित करणे –
ऑफिसच्या कामाचा ताण हा आपल्याला असतोच परंतु आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण रोजच्या जीवनातला थोडा वेळ देणे गरजेचे आहे. सर्वात आधी आपले डोळे बंद करा आणि आपले लक्ष श्वासाकडे वळवा. तुमचा श्वास मंद करण्याचा प्रयत्न करा आणि खोल श्वास घ्या, प्रत्येक श्वास आत घेताना आणि सोडताना तुमचे पोट फुगवा आणि आत ओढा. यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल आणि तुम्ही तणावाची पातळी कमी होण्यास मदत होईल.

मन लावून खाणे –
आपले असलेले पेंडिंग कामाच्या घाई गडबडीमध्ये आपण दुपारचे जेवण पटपट खातो . पण असे न करता हळूहळू खाण्याचा सर्व करण्यासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. जेवताना लहान घास घ्या आणि प्रत्येक घासाच्या चवीकडे लक्ष देऊन हळूहळू अन्न चावून खावे. यामुळे तुम्हाला अन्नाचा आस्वाद तर येणारच आणि तणाव कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते.

विश्रांती घेणे –
कामाचा तणाव कमी करण्यासाठी दिवसभरामध्ये छोटी विश्रांती घेणे गरजेचे आहे. कामाचा वेळेत काही मिनिटासाठी टायमर सेट करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा फक्त शांत बसून तुमचे विचार आणि भावनांचे निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला तुमचे मन शांत करण्यात आणि तणावाची पातळी कमी करण्यास मदत होईल. 

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss