Thursday, June 1, 2023

Latest Posts

ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

ओठांवर सोंदर्य प्रसाधनांचा जास्त वापर केल्यानेही ओठांचे सोंदर्य कमी होते. त्यामळे ओठ काळसर दिसून येतात व ओठ फाटतात अशा समस्या जाणवतात.

त्वचा चमकदार व्हावी म्हणून आपण सतत अनेक उपाय करत असतो. मात्र अनेकदा ओठांकडे दुर्लक्ष करतो. त्वचेबरोबरच ओठांची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. ओठ देखील त्वचेप्रमाणेच नाजूक असतात. ओठांवर सोंदर्य प्रसाधनांचा जास्त वापर केल्यानेही ओठांचे सोंदर्य कमी होते. त्यामळे ओठ काळसर दिसून येतात व ओठ फाटतात अशा समस्या जाणवतात. पण या सर्व समस्या दूर होण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय.
१. ओठ फाटत असतील तर मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना ओठांवर लावल्यास ओठ नरम होतील व सतत फाटणार नाही.
२. झोपण्यापूर्वी बदामाचं तेल किंवा एरंडेल तेलाने ओठांवर मालिश केल्याने ओठांचा रंग उजळण्यास मदत होईल.
३. नियमितपणे बिटाचा रस ओठांवर लावल्यास नैसर्गिकरित्या ओठ गुलाबी होतात.
४. त्वचेवर चमक आणण्यासाठी लिंबाचा वापर करतात. तसेच लिंबू ओठांसाठी देखील तितकाच फायदेशीर आहे. नियमित सकाळ व संध्याकाळ लिंबाचा रस ओठांवर लावल्यास ओठांचा काळसरपणा दूर होतो.
५. डाळिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून ओठांवर मसाज केल्यास ओठ स्वच्छ होतील.
६. नियमित भरपूर पाणी प्यायल्याने ओठ कोरडे आणि काळे होणार नाही.
७. रात्री झोपण्यापूर्वी कोथिंबीर च्या पानांचा रस ओठांवर लावल्यास ओठांच्या कोणत्याच समस्या जाणवणार नाहीत.

Latest Posts

Don't Miss