spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

केसगळतीने कंटाळले आहात? करून पहा हे उपाय

पावसाळ्यात केस गळतीची (Hair loss) समस्या खूप सामान्य आहे. पण याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. पावसाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, घरच्या घरी तुम्ही तेल तयार करुन यापासून सुटका मिळवू शकता.

पावसाळ्यात केस गळतीची (Hair loss) समस्या खूप सामान्य आहे. पण याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. पावसाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, घरच्या घरी तुम्ही तेल तयार करुन यापासून सुटका मिळवू शकता. सुंदर, घनदाट आणि लांब केस प्रत्येकाला हवे असतात. पण केस गळतीमुळे अनेकांची ही इच्छा अपूर्ण राहते. विशेषत: पावसाळ्यात केस गळणे आणि केस तुटण्याची समस्या ही खूप जास्त असते. दमट वातावरणामुळे किंवा केस ओले राहिल्यामुळे पावसाळ्यात केस गळतीचे प्रमाण खूप वाढते. यावर उपाय म्हणून बाजारात अनेक खर्चिक उत्पादने उपलब्ध आहेत. पण तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करुन केसगळतीपासून सुटका मिळवू शकता. खोबरेल तेल आणि जास्वंद यांच्यापासून तयार केलेलं तेल हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तर खोबरेल तेल आणि जास्वंद यांच्यापासून तेल कसे करायचे ते जाणून घेऊयात.

खोबरेल तेल आणि जास्वंद याच्यापासून तयार केलेले तेल
साहित्य –
१ कप खोबरेल तेल
१ मूठभर कढीपत्ता
२ चमचे आवळा पावडर किंवा सुकलेला आवळा
२ टिस्पून मेथी दाणे
२ जास्वदाची फुले

केसांचे तेल बनवायचे कसे?
सर्वप्रथम एक काचेची बॉटल (bottle) घ्या. काचेच्या बॉटलमध्ये खोबरेल तेल घाला. त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि आवळा पावडरसह इतर सर्व साहित्य घाला. त्याचे झाकण घट्ट बंद करा. एक ते दोन आठवडे ही बॉटल दररोज सुमारे 3 तास सूर्यप्रकाशात ठेवा. या तेलाचा रंग गडद होईपर्यंत या तेलाला सूर्यप्रकाश दाखवा. तेलाचा रंग हा गडद झाल्यानंतर हे तेल वापरासाठी तयार आहे. रोज तेल हलकंस गरम करा आणि केसांना व्यवस्थित मॉलिश (Massage) करा. हे आठवड्यातून २ – ३ वेळा केसांना लावा.

तेल वापरण्याची नेमकी पद्धत
तेल वापरण्याआधी ते एका छोट्या वाटीत घेऊन डबल बॉयलर (Double boiler) पद्धतीने कोमट करा आणि त्यानंतरच तो केसांना लावा. किमान पाच मिनिटे केसांना हलक्या हाताने नीट मालिश करा. त्यानंतर किमान ३० ते ४० मिनिटे हे तेल केसांना लावून ठेवा. यानंतर तुम्हील शाम्पूने (with shampoo) केसं स्वच्छ धुवू शकता. तुम्ही हे तेल रात्री केसांना लावून रात्रभर ठेवू शकता आणि सकाळी उठल्यावर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा या तेलाचा वापर करा. तुम्हांला केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss