Saturday, April 20, 2024

Latest Posts

Accident पासून बचाव करायचा असेल तर, करा ‘या’ गोष्टींचे पालन

मानवी चुकांमुळं होणाऱ्या अपघातांमुळं सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं तुम्ही प्रवास करत असताना त्यावेळी अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते.

सध्या महामार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. आणि आता तर महामार्गावर अपघाताचे प्रमाण हे आणखी जास्त वाढत चालेले आहे. भारतात दरवर्षी अपघातामुळं मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. याशिवाय मानवी चुकांमुळं होणाऱ्या अपघातांमुळं सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं तुम्ही प्रवास करत असताना त्यावेळी अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते.

दारू पिऊन गाडी चालवू नका –

जर तुम्ही कुठे गाडी ने फिरणार असाल तर तुम्ही मुळीच ड्रिंक (दारू) करू नका. किंवा तुमच्या गाडीच्या वाहनचालकानं मद्यपान करण्यास बंधनकारक करा. तसेच तुम्ही जर का वाहन चालवताना मद्यपान केले तर गाडी चालण्याचं भान राहत नाही. त्यामुळं गाडीचा अपघात होण्याचा होण्याचा धोका वाढतो.

झोप येत असेल तर गाडी चालवू नका –

तुम्हाला जर का रात्री चे कुठं जायचं असेल तर शक्यतो तुमच्या झोपेची सर्व काळजी घ्या आणि मगच घराबाहेर निघा. कारण अनेकदा आपण दिवसभर काम करत असताना प्रचंड थकवा येतो. त्यामुळं वाहन चालवत असताना वाहन चालकाला झोप येण्याची शक्यता असते. वाहन चालवत असताना जर तुम्हाला झोप येत असेल तर रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून झोप घ्यायला हवी, झोप पूर्ण झाल्यानंतरच गाडी चालवा अन्यथा अपघात होण्याचा धोका वाढतो.

गाडीचा वेग कमी ठेवा –

तुम्ही गाडी चालवत असताना तुमच्या गाडीचा वेग हा नियंत्रणात ठेवा. अनेक अपघात हे प्रचंड वेगानं गाडी चालवल्यामुळं होत असतात. कारण गाडी चालवत असताना वाहनाला असलेली स्पीड कंट्रोल करणं फार कठीण असतं. त्यात वाहनासमोर व्यक्ती, प्राणी किंवा इतर गाड्या आल्या तर शंभर टक्के अपघात होतो.

हवामानाचा अंदाज घेऊन प्रवास करा-

जर तुम्ही कुठे लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर त्यावेळी वातावरण कसं आहे, याची सर्वात आधीखात्री करून घ्या. कारण अनेक ठिकाणी दाट धुकं, पाऊस किंवा ऊन असू शकतो. त्यामुळे सर्व ठिकाणची व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच पुढील प्रवास करा. उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळं रस्ते तापून वितळायला लागतात, अशा वेळेस गाडीचं टायर फुटण्याची शक्यता असते. तर पावसाळ्यात दाट धुक्यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे.

वाहतुकीचे नियम पाळा –

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वानीच वाहतुकीचे नियम हे पळाले पाहिजे. रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी काही नियम आणि अटी घातलेल्या असतात. त्या लोकांच्या भल्यासाठी आणि सुरक्षिततेसाठीच असतात. त्यामुळं गाडी चालवत असताना सिग्नलचा वापर करायला हवा. त्याच सोबत सर्व नियमांचं पालन देखील करायला हवे.

हे ही वाचा : 

जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही, छगन भुजबळ

MI vs LSG, जाणून घ्या एलिमिनेटर सामन्याची प्लेइंग ११, मुंबई विरुद्ध लखनौ

कोणता संघ होणार ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर? | Which team will be out of the trophy race? | MI VS LSG

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss