spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

झोपण्याआधी ‘या’ तेलाचा वापर चेहऱ्यासाठी करा; काय होतील फायदे

बदाम (Almond) हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आरोग्याबरोबरचं बदाम हे आपल्या त्वचेसाठी उपयोगी ठरते. बदाम जितके फायदेशीर आहे तितकेच बदामयुक्त तेल देखील फायद्याचे आहे. बदामाचा योग्य पद्धतीनं उपयोग केल्यास चेहऱ्यावर तेज येते हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे बदामाप्रमाणेच यापासून तयार केल्या जाणाऱ्या तेलाचे फायदे नक्की जाणून घ्या.

Beauty Tips : बदाम (Almond) हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आरोग्याबरोबरचं बदाम हे आपल्या त्वचेसाठी उपयोगी ठरते. बदाम जितके फायदेशीर आहे तितकेच बदामयुक्त तेल देखील फायद्याचे आहे. बदामाचा योग्य पद्धतीनं उपयोग केल्यास चेहऱ्यावर तेज येते हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे बदामाप्रमाणेच यापासून तयार केल्या जाणाऱ्या तेलाचे फायदे नक्की जाणून घ्या.

बदाम मस्तिष्काच्या कार्यासाठी अत्यंत लाभकारी असतात. ते मेंदूला उत्तेजित करतात, लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात आणि मानसिक शक्ती वाढवतात.बदाम हृदयासाठी चांगले असतात कारण त्यात फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात. त्याचबरोबर बदामात व्हिटॅमिन E असतो जो त्वचेसाठी चांगला मानला जातो. त्वचेवरून डाग, सुरकुत्या आणि इतर दोष कमी करण्यात मदत करतात. बदामात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पण बदामयुक्त तेलचे फायदे तुम्हाला माहित आहे का? तर नक्की जाणून घ्या या तेलाचे फायदे.

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, लोह, मॅगनिझ, फॉस्फोरस आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे सर्व घटक त्वचा आणि केसांसाठी पोषक आहेत. पण यासाठी बदामाचे शुद्ध तेल वापरणे गरजेचे आहे. तुम्हाला सुंदर आणि उजळ चेहरा हवा असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे काही थेंब आपल्या हातांवर घ्या. हातांचे पंजे एकमेकांवर घासा आणि संपूर्ण चेहऱ्यावर बदामाचे तेल लावा. आता गोलाकार दिशेनं चेहऱ्याचा हलक्या हातानं मसाज करा. नियमित हा उपाय केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल. बदाम तेलात नॅचरल मॉइश्चरायझर गुणधर्म असतात. ते त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचा कोरडी पडत नाही. बदाम तेलात व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चेहऱ्यावर असलेल्या डाग, सुरकुत्या, आणि क्लींजिंग साठी मदत करतात. ते त्वचेला मुलायम आणि गुळगुळीत बनवते. त्याचबरोबर बदाम तेलाच्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करते.

रोज-रोज भाजीला काय करायचं ? प्रश्न पडलाय? मग ‘ही’ रेसिपी खास तुमच्यासाठी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss