Tuesday, April 23, 2024

Latest Posts

चेहऱ्यावर चमक पाहिजे? मग ‘या’ पदार्थाचा करा उपयोग

उजळणार चेहरा हा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. उन्हाळ्यात प्रत्येकाचीच त्वचा अति उष्णतेमुळे काळसर पडू लागते. तसेच त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि निर्जीव होऊन जाते.

उजळणार चेहरा हा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. उन्हाळ्यात प्रत्येकाचीच त्वचा अति उष्णतेमुळे काळसर पडू लागते. तसेच त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि निर्जीव होऊन जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन याच्या परिणाम डिहायड्रेशनच्या रूपात दिसून येतो. अश्यावेळी मधाचा वापर केल्याने याचा आपल्या त्वचेवर चांगला फायदा दिसून येतो. मधामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने आपल्या त्वचेसाठी मधाचा चांगला फायदा होऊ शकतो.

मधामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. मधामध्ये व्हिटॅमिन सी (VITAMIN- C), बी’६ (B-6) , कार्बोहायड्रेट्स (CARBOHYDRATES), अमिनो ऍसिड (AMINO ACID) इत्यादी तत्व भरपूर असतात. या तत्वांचा आपल्या त्वचेवर चांगला फायदा होतो. तसेच मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial), अँटी-फंगल (Anti-fungal) आणि अँटी-ऑक्सिडंट (Anti-oxidant) गुणधर्म देखील आढळून येतात. चला तर मग जाणून घेऊयात नेमके काय केल्याने मिळेल चेहऱ्यावर चकाकणारा GLOW!

मधामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात व चांगला ग्लो येण्यासाठी मधाने नियमित मसाज करणे गरजेचे आहे. या साठी आपण मधाचा स्क्रब देखील बनवू शकतो. तर नेमका कश्या प्रकारे मधा चा स्क्रब तयार करावा चला जाणून घेऊयात.

मधाचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

मध १ चमचा
बेसन २ चमचे
साखर
पाणी

स्क्रब तयार करण्याची कृती –

मधाचा स्क्रब तयार करण्यासाठी एक वाटी घ्या.
नंतर १ चमचा मध, २ चमचे बेसन, साखर आणि पाणी घाला.
यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा
आता आपला स्क्रब तयार आहे.

स्क्रब कसा वापरावा –

हनी फेस स्क्रब लावण्यापूर्वी चेहरा धुवून स्वच्छ करावा.
यानंतर तयार केलेले स्क्रब आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा.
त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर थोडा वेळ मसाज करा.
त्यानंतर ते पाण्याने धुवून स्वच्छ करावे.

हे ही वाचा : 

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

सरकारला पुन्हा ५०० आणि १००० च्या नोटा चलनात आणाव्या लागणार, डॉ. भालचंद्र मुणगेकर

आयपीएलच्या इतिहासातील रेकॉर्ड २१ वर्षाच्या यशस्वीने मोडला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss