Thursday, April 25, 2024

Latest Posts

तजेलदार आणि तुकतुकीत त्वचा हवी आहे? आहारात करा ‘या’ फळाचा समावेश

डाळिंबाचा सेवन करणं आणि त्याचा इतर प्रकारे वापर करणं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. त्वचा खूप काळापर्यंत तजेलदार ठेवण्यासाठी डाळिंबाचा वापर करु शकता.

डाळिंबाचा सेवन करणं आणि त्याचा इतर प्रकारे वापर करणं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. त्वचा खूप काळापर्यंत तजेलदार ठेवण्यासाठी डाळिंबाचा वापर करु शकता.डाळिंब (POMEGRANATE) हे एकमेव फळ आहे जे संपूर्ण भारतात मिळते. याचा वापर जर रोजच्या जीवनात केला तर शरीरास खूप फायदा होऊ शकतो. न्यूट्रिशनचे सगळ्यात जास्त प्रमाण हे डाळिंबात असते. यामुळेच याला न्यूट्रिशनचे पाॅवर हाऊस म्हणले जाते. तसेच डाळिंबात मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिशन (NUTRITION) असते. ज्याचा शरीराला खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे त्वचेचे अनेक आजार कमी होऊ शकतात. डाळिंबामध्ये पोषणतत्त्वासोबतच चेहऱ्यासाठी उपयुक्त असे घटक असतात. ज्यामुळे तुमची स्किन ग्लो (GLOW) करू शकते. डाळिंबाचा त्वचेसाठी वापर कसा करावा ते जाणून घेऊया. डाळिंब हे शरीरासाठी जितके महत्वाचे तितकेच त्याचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. त्वचेच्या असणाऱ्या सर्व समस्या कमी होऊ शकतात. चेहऱ्यावरील फोड, कोरडेपणा किंवा काळी पडलेली त्वचा, वयानुसार डोळ्यांखाली येणारे काळी वर्तुळे या सगळ्यावर एक उपाय म्हणजे जास्तीत जास्त डाळिंबाचा सेवन. तसेच यामध्ये व्हिटामिन सी (VITAMIN C) असल्याने त्वचेवर तुकतुकीत होण्यास मदत होते. आपल्या रोजच्या ब्यूटी रुटीन (BEAUTY ROUTINE) मध्ये डाळिंबाचा वापर केला तर काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया.

डाळिंबाचा रस (POMEGRANATE JUICE)

डाळिंबाचा रस हा निरोगी त्वचेसाठी फार महत्त्वाचे काम करतो. यात असणारे व्हिटॅमिन सी त्वचेला तजेलदार बनवते. तसेच याच्या सेवनामुळे वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर असलेले काळे डाग, फोड आणि डोळ्याखाली काळे वर्तुळ देखील या डाळिंबाच्या रसाने कमी होऊ शकतात. परिणामी त्वचा निरोगी बनते.

डाळिंबाचे तेल (POMEGRANATE OIL)

डाळिंबाचे तेल त्वचेला हायड्रेट ठेवायला मदत करते. आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुण त्वचा तजेलदार करण्यास मदत करतात.

डाळिंबाच्या बीया (POMEGRANATE SEEDS)

डाळिंबाच्या बियांचा वापर करुन तुम्ही स्क्रब (SCRUB) बनवू शकता. हा स्क्रब चेहऱ्यावर लावला तर डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. हे स्क्रब बनवण्यासाठी डाळिंबाच्या काही बिया घ्याव्यात, त्या बारीक कराव्यात. नंतर त्यात गुलाब पाणी मिक्स करावे आणि त्यानंतर ते चेहऱ्यावर लावावे. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हा स्क्रब नियमित वापरल्याने तुमच्या त्वचेला अनेक फायदे होऊ शकतात.

हे ही वाचा:

Car Care Tips: गाडी मधून येतोय विशिष्ट प्रकारचा वास?

चहा पत्तीचा फक्त चहा बनविण्यासाठी नाही तर ‘या’ गोष्टीसाठी देखील फायदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss