Friday, April 19, 2024

Latest Posts

Dark Circles पासून मुक्ती हवी आहे का? या फळाचा करा वापर !

सध्याच्या काळात डार्क सर्कल्सची समस्या ही भयंकर समस्या बनली आहे.अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. काहींना डार्क सर्कल्सचा प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो.

सध्याच्या काळात डार्क सर्कल्सची समस्या ही भयंकर समस्या बनली आहे.अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. काहींना डार्क सर्कल्सचा प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. डार्क सर्कल्स होन्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या धावपळीच्या जीवनात झोप पूर्ण न होणे, रात्र रात्रभर जागरण करणे. तसेच मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप या गोष्टींचा जास्त प्रमाणात वापर करणे. आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स आल्याने आपल्या चेहऱ्याचे तसेच आपल्या डोळ्यांचे सौंदर्य निघून जाते. व आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याला पूर्णपणे ग्रहण लागते. डार्क सर्कल्स ही अगदी सामान्य समस्या आहे. शास्त्रज्ञाच्या मते ही समस्या ९५ टक्के लोकांना उद्भवते. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी अनेकजण विविध उपाय अजमवतात. तरीही या समस्येचे निराकरण होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्या साठी असा उपाय तथा एक असे फळ घेऊन आलो आहोत की जे वापरल्याने डार्क सर्कल्स कमी तसेच नाहीसे होण्यास मदत होईल.

केळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच खायला आवडतात. केळी खाऊन झाल्यानंतर आपण केळीच्या साली फेकून देतो. परंतु या साली आपल्या त्वचेसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर असतात. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट्स ही सत्व असतात. या सत्वांमुळे आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि संवेदनशील त्वचा कमी करण्यास मदत होते. तसेच केळीच्या साली मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक ही गुणधर्म सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या त्वचे ला खोलवर पोषण देतात. केळीच्या साली मुळे शरीरातील रक्तभिसरण सुद्धा सुधारते. चला तर मग जाणून घेऊयात डार्क सर्कल्स घालवण्या साठी केळीचे साल कसे वापरावे.

पहिला उपाय – डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी केळीची साल १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावी. नंतर फ्रिजमधून बाहेर काढून सुमारे १५ मिनिटे डोळ्यांखाली ठेवावी. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही रेसिपी अवलंबली तर डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यास चांगली मदत होईल.

दुसरा उपाय – सर्व प्राथम केळीचे साल बारीक करून त्यात कोरफड जेल घालून एकत्रित करून घावे. या नंतर तयार झालेले मिश्रण म्हणजेच पेस्ट डोळ्यांखाली जाड थरात लावावी. कालांतराने चेहरा स्वच्छ धुवून घावा. असे दररोज रात्री करावे.

तिसरा उपाय – केळीची साल बारीक करून तयार झालेल्या पेस्ट मध्ये २-३ थेंब लिंबाचा आणि मधाचा रस घालून मिक्स करावे. तयार झालेली पेस्ट डोळ्यांखाली सुमारे ८ ते १० मिनिटे लावावी. नंतर डोळे स्वच्छ धुवून घावे. असे केल्याने त्वचेला चांगला ओलावा मिळेल आणि काळी वारुळे नाहीसे होण्यास मदत होईल.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

Brijbhushan Singh यांच्यावर कारवाई होत नसल्याने कुस्तीपटूंनी केले मेडल्स विसर्जित

मुख्यमंत्री Eknaath Shinde ८ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार

सप्तशृंगी देवी मंदिर संस्थानने ड्रेसकोड संदर्भात कोणताही निर्णय नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss