spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

रक्षाबंधनला अधिक स्टायलिश दिसायचंय?, फॉलो करा ‘या’ खास स्टायलिंग टिप्स

प्रत्येक वर्षी श्रावणात आपण सगळे सण आनंद आणि उत्साहाने साजरा करतो. त्यामधील रक्षाबंधन हा सण सगळ्यांचं आवडतो.

प्रत्येक वर्षी श्रावणात आपण सगळे सण आनंद आणि उत्साहाने साजरा करतो. त्यामधील रक्षाबंधन हा सण सगळ्यांचं आवडतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते या बदल्यात भाऊ बहिणीचे रक्षण करतो. रक्षाबंधन चा दिवशी आपण नवं नवीन ड्रेस किंवा साडी घालतो. पण या वर्षी रक्षाबंधनाला तुम्हाला काही नवीन वेशभूषा किंवा स्टाईल करायची असेल तर पुढील टिप्स नक्की करून पाहा.

साडी:-
रक्षाबंधनसाठी साडी हा एक उत्तम पर्याय आहे. विविध रंगाच्या , प्रिंट असलेल्या, कॉटनचा साड्या आजकाल जास्त पाहायला मिळत आहे. कॉटनचा साडीवर डिझायनर ब्लाउस घालून सुद्धा खूप छान प्रकारे आपण स्टाईलिंग करू शकतो. ज्या मुलींना किंवा स्त्रियांना पारंपरिक लूक हवा असेल त्यांना पैठणी किंवा नक्षीकाम केलेल्या साडया त्या नेसू शकतात. पैठणी नेसल्यामुळे एक छान लुक आपण तयार करू शकतो. साड्यांमध्ये अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये रंग, फॅशन, स्टाईल तुम्ही निवडू शकता.

ड्रेस:-
बाजारामध्ये आत्ता खूप वेगवेगळ्या रंगांचे ,पॅटर्नचे,अनारकली ड्रेस उपलब्ध झाले आहेत. सध्या नायरा कट हे खूप जास्त मुली वापरात आहेत. हे माफक दारात उपलब्ध आहेत. अनारकली पॅटर्नमधील ड्रेस रक्षाबंधनला छान प्रकारे स्टाईल करून घालू शकतो. अधिक फॉर्मल लूकसाठी हेवी बॉर्डर(Heavy border) असलेले कुर्ती आपण वापरू शकतो.

साडीपासून शिवलेले ड्रेस :-
आजी किंवा आईचा एखाद्या जुन्या साडीपासून आपण आपल्या हव्यातश्या पॅटर्नमध्ये ड्रेस शिवू शकतो. साडीपासून आपण अनारकली, संपूर्ण ड्रेस, कुर्ती, कफ्तान, नारायणी ड्रेस, वन पीस, कॉर्ड सेट यासारखे नवनवीन प्रकारचे ड्रेस आपण शिवू शकतो. साडीपासून बनवलेला ड्रेस हा रक्षबांधनला घालण्यासाठी एक छान पर्याय आहे. कॉर्ड सेट हा सध्या बाजारात ट्रेंड मध्ये आहे.

सणसमारंभात वातावरणानुसार कपडे निवडणं जास्त योग्य आहे. काही वेळा उन्हाळ्यात आपण हवी बॉर्डर असलेले ड्रेस किंवा कुर्ती वापरतो त्याचामुळे शरीरावर रॅश, किंवा गरमीमुळे येणारी पुरळ येण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे वातावरण बघून कपडे निवडणे फार गरजेचे आहे. कपडे निवडताना प्रसंग विचारत घेऊन निवडले पाहिजेत.

हे ही वाचा:

हिंमत असेल तर अजितदादांना म्हणून दाखवा , संजय शिरसाट

यासाठी पाहावा ‘सुभेदार… गड आला पण…’

बहुप्रतीक्षित बापल्योक चित्रपट १ सप्टेंबरपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss