Thursday, April 25, 2024

Latest Posts

सुटलेले पोट कमी करायचे आहे ? करा ‘हे’ खास उपाय

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले स्वतःच्या आरोग्यावर तसेच फिटनेसवर अनेकदा दुर्लक्ष होते. शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले स्वतःच्या आरोग्यावर तसेच फिटनेसवर अनेकदा दुर्लक्ष होते. शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. शरीर फिट आणि टोन्ड दिसण्यासाठी लोक अनेक प्रकारचे व्यायाम आणि योगा करतात. तसेच जीममध्ये आतोनात पैसा ओततात. परंतु तरी देखील आपले वजन व शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होत नाही. आपल्या शरीरातील पोटावर तसेच कंबरे जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात चरबी आढळते. व यामुळे आपल्या शरीराचा शेप बिघडतो.

एकदा का पोटाचा घेर वाढला किंवा पोट सुटले की खुप मेहनत करुन देखील ते कमी होत नाही. आपल्या अनेक दैनंदिन जीवनातील सवयी वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तसेच शरीरातील चरबी नाहीशी करण्यासाठी सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक ला जाणे किंवा जीम लावणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. म्हणूनच आज आम्ही शरीर त्वरीत फिट व आकर्षक बनवण्यासाठी अनेक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात हे गुणकारी उपाय कोणते आहेत.

सकाळी उठल्यानंतर पुढील ड्रिंक्सचे सेवन केल्याने शरीरातील वजन कमी होण्यास मदत होईल.

ग्रीन टी – ग्रीन टी सेवनास अतिशय कडवट असते परंतु वजन कमी करण्यास मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते. यात साखरेचे प्रमाण भरपूर कमी असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी ग्रीन टी चे सेवन करावे.

लिंबू पाणी – लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी एक स्वस्त आणि सोपा पर्याय आहे. सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात १ लिंबू पिळून त्यात काळे मिठ मिसळून हे पाणी प्यायल्याने वजन कमी होते. दररोज हा उपाय केल्यास आपले वजन लवकर होईल.

ओव्याचं पाणी – ओवा प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात उपलब्ध असतो. ओव्याला कॅरम सिड्स (Carom Seeds) सुद्धा म्हणतात. ओवा खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म (Metabolism) रेट वाढतो यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी रात्री १ ग्लास पाण्यात ओवा मिसळून सकाळी हे पाणी गाळून प्यावे.

मेथीचं पाणी – मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (Fiber) आढळून येते. ज्यामुळे शरीरातील भूक कमी होते. तसेच खाण्याची इच्छा सुद्धा कमी होते. माणूस जास्त खाणे आरामात टाळू शकतो. कमी आहारामुळे आपले वजन वाढत नाही. तसेच या बीया शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात.

नारळ पाणी – नारळाच्या पाण्यात फायबर (Fiber), पोटॅशियम(Potassium), प्रथिने (Protein) आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) यांसारखे पोषक सत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच यात कॅलरीज (Calories) चे प्रमाण देखील कमी असते. हे शरीरातील पचन प्रक्रिया सुधारते तसेच चयापचय दर सुद्धा वाढवते.

भाज्यांचा रस – फायबर (Fiber) सोबत अनेक विविध पोषक सत्व भाज्यांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. यात कॅलरीजचे प्रमाण सुद्धा कमी असते. वजन कमी करण्यासाठी भाज्यांचा रस हा उत्तम पर्याय आहे. एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की ज्यांनी आपल्या आहारात भाज्यांचे रस घेतले त्यांचे वजन जास्त कमी झाले आहे.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंना एका वाक्यात लगावला टोला

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही, राधाकृष्ण विखे पाटील

पुन्हा एकदा संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss