Friday, December 1, 2023

Latest Posts

WEATHER UPDATE: काही ठिकाणी गुलाबी थंडी तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज

नोव्हेंबर महिना सुरू होताच धुकेही वाढणार आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजस्थानमध्येही हवामान बदलणार आहे. याशिवाय उत्तराखंडसह जम्मू-काश्मीर, लेह, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या कडाक्याच्या तापमानानंतर (October Heat) आता देशातील विविध ठिकाणी थंडीची सुरुवात झाली आहे. तर देशाच्या दक्षिणेकडे असलेल्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार केरळ (Kerala) आणि तामिळनाडू (Tamilnadu) या ठिकाणी ३० ऑक्टोबर म्हणजेच आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, लेह-लडाख, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir), हिमालय प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात (Maharshtra) सुद्धा सध्या थंडी सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमानातघट होऊ लागल्याने थंडी वाढू लागली आहे. पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग (Sidhudurga) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यातील इतर ठिकाणी थंडीची सुरुवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचे वातावरण दिसून येत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, राज्यासह देशभरात १ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच, २९ ते ३० ऑक्टोबरच्या दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटकात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये तापमानात घट होत आहे. पुढील काही दिवस लखनौमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच नोव्हेंबर महिना सुरू होताच धुकेही वाढणार आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजस्थानमध्येही हवामान बदलणार आहे. याशिवाय उत्तराखंडसह जम्मू-काश्मीर, लेह, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

राज्यातील पहिल्या महिला सरपंचानी दिला राजीनामा

आता GOOGLE MAPS वर सुद्धा BHARAT नावाचा उल्लेख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss