spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Costly, भरजरी डिझाईन्सचे पॅडेड Blouse धुण्याची सोपी पद्धत कोणती? जाणून घ्या

महागडे, भरजरी डिझाईन्सचे ब्लॉऊज वापरताय पण ते घालून झाल्यावर धुताना खराब होण्याची भीती आहे. साडीपेक्षा ब्लाऊजची डिझाईनच लुकची शोभा वाढवते. साडी साधी असेल तरीही ब्लाऊज भरजरी असेल तर तुम्ही सुंदर दिसता. हल्लीच्या फॅशनमध्ये रेडिमेड आणि पॅडेड ब्लाउजची लोकप्रियता वाढली आहे. महिलांना या ब्लाउजमुळे वेगवेगळ्या डिझाइन्स (Designs) आणि रंगांचे पर्याय मिळतात, तसेच वेळ आणि शिलाईचे पैसेही वाचतात.पॅडेड ब्लाउजमुळे ब्रेस्टचा शेप व्यवस्थित दिसतो, म्हणूनच अनेक महिला याला प्राधान्य देतात. मात्र, पॅडेड ब्लाउज (Padded Blouse) योग्य पद्धतीने धुणे आवश्यक असते, कारण चुकीच्या पद्धतीमुळे पॅड खराब होण्याची शक्यता असते.

पॅडेड ब्लाउज धुताना आणि सुकवताना वॉशिंग मशीनचा वापर करणे टाळा. Washing Machine मध्ये ब्लाउज सुकविल्यास पॅड्सचा शेप खराब होतो आणि ब्लाउजवरील डिझाइन देखील खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी ब्लाउजला हाताने धुवून टॉवेलमध्ये ठेवून हलक्या हाताने पाणी काढून टाका. यामुळे पॅड्स आणि ब्लाउजचा शेप चांगल्या प्रकारे टिकून राहतो. गरम पाण्याचा वापर केल्यास पॅड्स खराब होण्याची शक्यता असते. गरम पाण्यामुळे पॅड्सचा आकार बदलू शकतो, ज्यामुळे ब्लाउजची फिटिंग बिघडते.अनेकांना वाटतं की गरम पाण्यात कपडे धुतल्याने ते अधिक स्वच्छ होतात, परंतु पॅडेड ब्लाउजच्या बाबतीत हे लागू होत नाही. ब्लाउज धुताना हलकं कोमट किंवा साधं पाणी वापरावं.

पॅडेड ब्लाउज धुण्याच्या वेळी ब्रशचा वापर करू नका. ब्रशने घासल्याने ब्लाउजवरील डिझाइन खराब होऊ शकते आणि पॅड्स देखील फाटू शकतात. त्याचप्रामणे मणी, कुंदन, वर्क वाले ब्लाउज धुण्यासाठी हलक्या हाताने हलकं लिक्विड डिटर्जंट वापरा. हट्टी डागांसाठी पाण्यात थोडं लिक्विड टाकून ब्लाउज हलक्या हाताने घासून धुवा. यामुळे पॅड्स सुरक्षित राहतील आणि ब्लाउजची चमक कायम राहील.भरजरी, महागडे पॅडेड ब्लाउज सुकवण्यासाठी कडक उन्हाचा वापर करू नका. कडक उन्हामुळे ब्लाउजचा रंग फिका पडण्याची शक्यता असते.त्याचप्रमाणे डिझाईन खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी ब्लाउज हलक्या सूर्यप्रकाशात सुकवा. यामुळे ब्लाउजच्या रंगाची चमक टिकून राहते आणि पॅड्स देखील सुरक्षित राहतात.ब्लाउज सुकल्यानंतर त्याला व्यवस्थित फोल्ड करणे महत्त्वाचे आहे. फोल्ड करताना पॅड्सच्या आकारावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. पॅड्स फोल्ड होऊ नयेत यासाठी ब्लाउजला नीट Fold करून ठेवावे. यामुळे ब्लाउजची फिटिंग चांगली राहते आणि पुढील वापरासाठी देखील ब्लाउज तयार राहतो. अशा पद्धती वापरल्यास पॅडेड ब्लाउजची काळजी योग्य प्रकारे घेता येते आणि ब्लाउज दीर्घकाळ टिकतो.

हे ही वाचा :

Dandruff समस्येसाठी करा हा रामबाण उपाय

Ramdev Baba व बागेश्वर धामच्या बाबांना एका टीव्ही शो दरम्यान Mamta Kulkarni चे सडेतोड उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss