थंडीचे दिवस सुरु आहेत. या वातावरणात शरीराला ऊर्जा मिळणे गरजेचे असते, यासाठी अनेक जण उन्हात बसतात. त्यामुळे काहींचे गाल लाल होतात. पण हे गाल लाल होण्यामागचे मुख्य कारण नाही, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हे होऊ शकते. जर तुम्हालाही या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही या मार्गांचा अवलंब करू शकता.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमीच असतो. त्यामुळे कोवळ्या सूर्यप्रकाशात अनेकजण जाऊन बसतात, पण उन्हात बसल्यानंतर काही लोकांचे गाल लाल होतात. त्याचसोबत गालांमधील रक्तवाहिन्या अधिक सक्रिय होतात, त्यामुळेहि गाल लाल होऊ शकतात.हि समस्या सामान्य असली तरी याकडे दुर्लक्ष करू नका, कारण यामागे गंभीर कमतरतेचे लक्षण देखील असू शकते. हि समस्याथंड वातावरण आणि सूर्यप्रकाशामुळे असे होऊ शकते. परंतु प्रत्यक्षात हे शरीरात काही पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शरीरात अनेक महत्त्वाचे घटक असतात जे निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि या घटकांच्या कमतरतेमुळे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
सूर्यप्रकाश
व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्त्रोत शरीरात कमी असल्यामुळे किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे या समस्या उद्भवू शकतात. तुमची त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे रूपांतर शरीरात व्हिटॅमिन डीमध्ये होते. व्हिटॅमिन डीचा सर्वात नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. जेव्हा तुमची दररोज किमान १०-२० मिनिटे उन्हात बसण्याचा प्रयत्न करा.
आहाराची काळजी घ्या
हिवाळ्यात काही पोषणतत्त्वांची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे त्वचेच्या रंगावर परिणाम होतो. त्यासाठी आहारात मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यासारख्या व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तुम्ही फोर्टिफाइड सोया मिल्क, ओट्स आणि संत्र्याचा ज्यूसदेखील पिऊ शकता.
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा
हिवाळ्यात निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सुदृढ राहतात. हिवाळ्यात थोडं कमी पाणी पिऊन गडबड होऊ शकते, परंतु त्वचा आणि शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणं महत्त्वाचं आहे.हिवाळ्यात देखील नियमित व्यायाम महत्वाचा आहे. हिवाळ्यात उन्हाचे प्रमाण कमी असल्याने शरीराला अधिक विश्रांतीची आवश्यकता असते. आठ तासांची झोप घ्या आणि झोपेचे आरोग्यदायक नियम पाळा.हिवाळ्यात चहा, कॉफी आणि मद्यपानाची आवड अधिक वाढू शकते. याचे सेवन कमी करा.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?