कांदा म्हटलं की भारतीय स्वयंपाकघरात जवळपास प्रत्येक पदार्थात याचा वापर केला जातो. कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर कांद्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. त्यात पोषणतत्त्व, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. खरतर, भारतीय घरामध्ये लाल कांदा खाल्ला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? आणि जर माहित असेल तर पांढरा आणि लाल कांद्यातला फरक तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
बाजारात लाल कांद्याव्यतिरिक्त पांढरा कांदा देखील उपलब्ध आहे. अनेक लोकांना वाटते की दोन्हीही एकसारखेच असल्यामुळे जेवणात वापरले जाऊ शकतात. पण सत्य हे आहे की, पांढरा आणि लाल कांदा यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. हे फरक त्यांच्या रंग, चवी, पोषणतत्त्व आणि वापरांमध्ये दिसून येतात. आपण पाहुयात पांढऱ्या आणि लाल कांद्यातला काय फरक आहे.
पांढरा आणि लाल कांदा यातील फरक
Red Onion यामध्ये लाल किंवा जांभळ्या रंगाचे थर असतात. लाल कांद्यातील आतील भाग हलक्या गुलाबी रंगाचा असतो आणि White Onion याचा बाहेरील भाग हाल पांढऱ्या रंगाचा असतो आणि आतील भाग देखील पूर्णपणे पांढरा असतो. पांढऱ्या कांद्याची चव हलकी, गोडसर आणि कमी तीव्र असते. याचे ताजेपण अधिक असते, आणि उकडलेल्या किंवा कच्च्या स्वरूपात वापरले जाते,तर लाल कांद्याची चव तीव्र आणि तिखट असू शकते. पांढऱ्या कांद्याला चव जास्त असते, त्यामुळे अनेक वेळा ह्याचा वापर सॅलड्स किंवा गरम पदार्थांच्या सजावटीसाठी केला जातो.
पोषणतत्त्व:
पांढऱ्या कांद्यामध्ये पोटॅशियम आणि फॉलिक आम्ल (folic acid) असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यात मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. पांढऱ्या कांद्यात अँटीऑक्सिडंट्स, जसे की फॅलेवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन C असतात, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकट करतात आणि संक्रमणापासून बचाव करण्यात मदत करतात. लाल कांद्यात फायबर्सचा समृद्ध स्त्रोत आहे, जे पचन क्रियेला उत्तेजन देतात. हे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि गॅस, अपचन, आणि अॅसिडिटी कमी करण्यात मदत करते. त्याचबरोबर लाल कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुण असतात, जे सर्दी, खोकला, आणि दमा यासारख्या श्वसन समस्यांवर प्रभावी ठरतात. कांद्याचा रस किंवा त्याच्या सेवनाने श्वास घेतात.
वापर:
पांढरा कांदा: पांढरा कांदा अधिक हलका कच्चा असल्याने त्याला भाजून त्याचा जेवणात वापर केला जातो. तो सलाद, बर्गर, सँडविच आणि इतर पदार्थांमध्ये देखील वापर होतो.
लाल कांदा: लाल कांदा अधिक तीव्र चवीचा असल्याने सॅलड्स, चटणी, आणि मसालेदार पदार्थांमध्ये वापरला जातो. तसेच, काही डिशमध्ये त्याचा रंग आणि चव उत्तम परिणाम देतो.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत